Alia Bhatt: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने कॅन्स फिल्म फेस्टिव्हल 2025 मध्ये पदार्पणा दरम्यान, भारत-पाकिस्तान दरम्यान वाढत्या तणावाच्या काळात भारतीय सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना समर्पित एक भावनिक पोस्ट आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली. या पोस्टमध्ये तिने देशभरातील नागरिकांच्या चिंतेचा उल्लेख करत, सीमारेषेवर आपल्या कर्तव्यावर असलेल्या सैनिकांच्या धैर्याचे आणि त्यागाचे कौतुक केले.
आलियाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, "गेल्या काही रात्रींमध्ये एक प्रकारची शांतता जाणवली आहे, जणू संपूर्ण देश श्वास रोखून बसला आहे." तिने सैनिकांच्या कुटुंबीयांच्या विशेषतः सैनिकांच्या आईंच्या त्यागाचीही आठवण सुरु केले, जी आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी रात्री झोपत नाहीत. तिने म्हटले, "प्रत्येक गणवेशामागे एक आई आहे, जी अनेक रात्री झोपलेली नाही."
या भावनिक पोस्टनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी आलियाच्या देशभक्तीचे कौतुक केले, तर काहींनी तिच्या आई, अभिनेत्री सोनी राजदान यांच्या शांततेच्या याचिकेमुळे आलियावर टीका केली. सोनी राजदान यांनी भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर शांततेसाठी एक याचिका शेअर केली होती, ज्यावर काही सोशल मीडिया नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
या संमिश्र प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर, आलियाने आपल्या देशभक्ती दाखवत, "मी आपल्या सशस्त्र दलांना आज आणि दररोज सलाम करते. जय हिंद," असे म्हटले. तिच्या या वक्तव्याने तिच्या देशप्रेमाचे सोशल मिडीयावर कौतुक होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.