Alia Bhatt : अगं बाई किती गोड! 'नाटू नाटू' गाण्यावर थिरकते आलियाची लेक

Alia Bhatt Shares Raha Story : आलिया भट्टची लेक 'राहा' ही नेहमी तिच्या क्युट स्माइलने चाहत्यांना वेड लावते. अलिकडेच आलियाने राहाचा एक किस्सा शेअर केला आहे.
Alia Bhatt Shares Raha Story
Alia BhattSAAM TV
Published On

आलिया (Alia Bhatt) आणि रणबीरची (Ranbir Kapoor) लेक राहा तिच्या क्युटनेसमुळे नेहमी चर्चेत असते. 2022 मध्ये राहाचा जन्म झाला. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर बॉलिवूडचं पावर कपल आहे. रणबीर आणि आलिया नेहमीच राहाबद्दल आपल्या मुलाखतीत बोलत असतात.

अवघ्या दोन वर्षांच्या राहाला (Raha Kapoor) जूनियर एनटीआर आणि रामचरणच्या 'नाटू नाटू' गाण्यावर नाचायला खूप आवडते. 'जिग्रा' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान आलियाने राहाचा एक गोंडस क्षण शेअर केला आहे. आलियाने सांगितलं की, "घरी जेव्हा 'नाटू नाटू' वाजतं तेव्हा राहाला ते खूप आवडतं आणि ती त्या गाण्यावर नाचते. तसेच ती स्वतः ममा नाटू नाटू वाजवा..असे आलियाला बोलते. त्यानंतर आम्ही हे गाणं वाजवतो."

पुढे आलिया बोलते की, "राहाला 'नाटू नाटू'ची स्टेप कशी करतात हे माहित नाही. त्यामुळे ती मी काही अवॉर्ड फंक्शनमध्ये नाटू नाटू वर स्टेप केली होती तो व्हिडीओ पाहायला मागते." ते राहा म्हणते की, "नाटू नाटू करताना ममाचा व्हिडिओ", मग आम्ही तो व्हिडिओ दाखवतो. त्यानंतर राहा मलाही नाचायला लावते. आम्ही दोघ एकत्र 'नाटू नाटू'वर भन्नाट डान्स करतो.

आलिया नेहमी आपल्या चित्रपटांमधील गाणी राहाला दाखवत असते. राहाने 'राधा तेरी चुनरी' आणि 'बत्तमीज दिल' तसेच 'केसरिया' गाण पाहिलं आहे. राहाला गाणी खूप आवडतात असे आलियाने सांगितले आहे.

Alia Bhatt Shares Raha Story
Suraj Chavan : 'माझा सिनेमा सगळे रेकॉर्ड मोडणार...', गुलीगत सूरज नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com