RRR Star: ज्युनिअयर एनटीआरच्या मुलांसाठी आलियाने पाठवले खास गिफ्ट, पोस्ट शेअर करत अभिनेत्याने केली 'ही' मागणी

Alia Bhatt Send Gift: इदिमामा ब्रँडचे कपडे आलियाने ज्युनियर एनटीआरच्या मुलांसाठी पाठवले आहेत.
Alia Bhatt Send Gift To Jr NTR's Kids
Alia Bhatt Send Gift To Jr NTR's KidsInstagram
Published On

Alia Bhatt Send Gift To Jr NTR's Kids: आरआरआर चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार जिंकल्यानंतर सर्वत्र या चित्रपटाची चर्चा होती. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन काल एक वर्ष पूर्ण झालं आहे. सर्वत्र सारं चरण आणि ज्युनिअयर एनटीआर यांच्या कौतुकाचे वारे वाहत आहे. तर या सगळ्या ज्युनिअयर एनटीआरने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे आलियाचे आभार मानले आहेत.

2021 मध्ये, आलिया भटने लहान मुलांसाठी इदिमामा या कपड्यांच्या ब्रँडची सुरूवात केली. याविषयी तिने सोशल मीडियावर पोस्ट देखील केले होते. तर आलियाने तिचा को-स्टार ज्युनियर एनटीआरची मुले नंदामुरी अभय राम आणि नंदामुरी भार्गव राम यांच्यासाठी गिफ्ट पाठवले आहेत. इदिमामा ब्रँडचे कपडे आलियाने ज्युनियर एनटीआरच्या मुलांसाठी पाठवले आहेत.

Alia Bhatt Send Gift To Jr NTR's Kids
Bhojpuri Actress Akanksha Dubey: सिनेसृष्टीवर शोककळा, वयाच्या २५व्या वर्षी अभिनेत्री आकांक्षाने संपवले जीवन

मुलांसाठी पाठवलेल्या भेटवस्तूचे फोटो ज्युनियर एनटीआरने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर आलिया भटचे आभार मानले आहे. 'इदिमामा अभय आणि भार्गवच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू आणतात. माझ्याही नावाची बॅग लवकरच मिळेल मला मिळेल अशी अपेक्षा करतो.' असे ज्युनियर एनटीआरने त्याच्या स्टोरीवर लिहिले आहे.

आलिया भट्टने जूनियर एनटीआरची स्टोरी पुन्हा शेअर करत त्यावर लिहिले आहे, ये!! हाहाहा मी तुला ईदसाठी खास कपड्यांच्या सेट पाठवेन. तू खूप गोड आहेस. धन्यवाद!! याशिवाय आलिया भट्टने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट देखील शेअर केली आहे ज्यात RRR च्या रिलीजला एक वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे.

Instagram Story
Instagram StorySaam Tv

RRR ला जगभरातील चाहत्यांचे प्रेम मिळाले आहे. इतकंच नाही तर RRR च्या नाटू नाटू गाण्याला 95 व्या ऑस्कर सोहळ्यात सर्वोत्कृष्ट ओरिजनल गाण्याचा पुरस्कारही मिळाला आहे. हा चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित करण्यात आला तेथे देखील हा हिट ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com