Alia bhatt : मूड ऑफ झाल्यावर काय करते? आलिया भट्टने मोजक्या शब्दात सांगितले

Alia bhatt Latest News : मूड ऑफ झाला किंवा चिंता वाटू लागल्यावर काय करते, याविषयी आलिया भट्ट जय शेट्टीच्या पॉडकास्टमध्ये सर्व सांगितलं. आलिया भट्ट तिच्या आयुष्याविषयी काय म्हणाली? वाचा
Alia bhatt News
Alia bhattSaam tv
Published On

अभिनेत्री आलिया भट्ट एडीएचडी आणि चिंता या आजाराचा सामना करत आहे. गेल्या काही वर्षांपासून आलिया या आजाराशी सामना करत आहे. चिंता वाटायला लागल्यास काय करते, याविषयी बोलताना आलिया भट्ट म्हणाली,' मी दुसऱ्यांच्या घरात डोकावते. मी दुसऱ्यांच्या घरात डोकावल्याने फायदा होतो'.

Alia bhatt News
Alia Bhatt : आलिया भट्ट आणि राहाच्या 'त्या' फोटोची चर्चा; चाहते म्हणाले, 'नववर्षी मायलेकी...'

'मी लोकांच्या बेडरुम डोकावत नाही'

अभिनेत्री आलिया भट्टने जय शेट्टीच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं की, 'माझा दिवस चांगला जात नसेल, तर मी माझ्या घरातील बाल्कनीमध्ये जाते. तशी बाल्कनी फार छोटी आहे. मी तिथे जाऊन उभी राहते'.

आलिया पुढे म्हणाली, 'बाल्कनीतून अनेक घरे दिसतात. मी समोरील घरात डोकावते. दुसऱ्यांच्या घरात कोणी कपडे घेऊन जाताना दिसतं. तर कोणी टीव्ही पाहताना दिसतं. फक्त मी लोकांच्या बेडरुममध्ये डोकावत नाही. यामुळे मला दुसऱ्यांच्या अस्तित्वाची जाणीव होते'. A

Alia bhatt News
Ranbir Kapoor- Alia Bhatt : रणबीर कपूर आलिया भट्टच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका मर्सिडीजचा समावेश; ही आहेत वैशिष्ट्ये

आयुष्याविषयी आलिया काय म्हणाली?

'तुम्ही तुमच्या आयुष्याविषयी भरपूर विचार करतात. विचार करताना म्हणता की, तो माझा क्षण आहे. हा माझा क्षण आहे. तुमच्या समस्या दूर होतात. तेव्हा एका सेकंदानंतर तुम्ही आयुष्यात कुठे आहात, याबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटू लागते, अशी आलिया पुढे म्हणाली.

Alia bhatt News
Alia Bhatt: आलियानं ते फोटो टाकताच इंटरनेटचं तापमान वाढलं

आलियाची सोलो ट्रिपवर जाण्याची इच्छा

आलिया भट्ट पुढे म्हणाली, 'मला लवकरच सोलो ट्रिपवर जाण्याची इच्छा आहे. मी मागील काही काळापासून सोलो ट्रिपवर जाण्याचा विचार करत आहे. मी याबाबत रणबीरशी देखील बोलले आहे. आम्ही प्लान केला आहे की, काही दिवस माझा नवरा रणबीर कपूर सोलो ट्रिपवर जाईल. त्यानंतर मी सोलो ट्रिपवर जाईल'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com