Akshaye Khanna: बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना लवकरच एका दमदार पौराणिक भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रशांत वर्मा दिग्दर्शित ‘महाकाली’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा पहिला लूक आणि टीझर समोर आला आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना असुरांचे गुरू शुक्राचार्य यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याचा लूक समोर येताच सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. ‘महाकाली’च्या टीझरमध्ये अक्षय खन्नाचा लूक पाहायला मिळतो. त्याच्या हा नवा लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत.
‘महाकाली’च्या टीझरची सुरुवात एका लहान मुलाच्या रडण्याच्या आवाजाने होते. त्यानंतर अक्षय खन्नाचा आवाज ऐकू येतो. शुक्राचार्यांच्या भूमिकेत तो देव आणि असुर यांच्यातील भेदभावावर प्रश्न उपस्थित करताना दिसतो. समुद्रमंथनात देव आणि असुरांचे समान योगदान असतानाही अमृत केवळ देवांना मिळाले, इंद्राच्या सिंहासनावर असुरांचा अधिकार नाकारण्यात आला आणि संपूर्ण असुर कुळाला पाताळलोकात पाठवण्यात आले, असे प्रश्न शुक्राचार्य उपस्थित करतात. ‘हा धर्म आहे की अधर्म?’ असा सवाल करत तो असुरांच्या विजयाची घोषणा करताना दिसतो. यानंतर अक्षय खन्नाचा दमदार लूक समोर येतो.
टीझरच्या अखेरीस महाकालीचीही झलक दाखवण्यात आली आहे. अभिनेत्री भूमी शेट्टी ही महाकालीची भूमिका साकारत आहे. भूमीने यापूर्वी कन्नड आणि तेलुगू टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. ती ‘बिग बॉस कन्नड’मध्येही स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. टीझर पाहिल्यानंतर सोशल मीडिया युजर्सनी अक्षय खन्नाच्या अभिनयाचे कौतुक केले आहे.
‘महाकाली’ हा चित्रपट ८ जानेवारी २०२७ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तमिळ, तेलुगू, मल्याळम, हिंदी आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज केला जाणार आहे. विशेष म्हणजे याच दिवशी गोविंदाचा मुलगा यशवर्धनच्या पदार्पणाचा ‘हिरो की हिरोइन’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर दोन्ही चित्रपटांमध्ये टक्कर पाहायला मिळू शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.