Ajay Devgn: अभिनेता अजय देवगणला BMC चा दणका; जुहूच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा

Ajay Devgn: अभिनेता अजय देवगणच्या जुहूतील बंगल्यात अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मुंबई महापालिकेने नोटीस बजावली असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ajay Devgn
Ajay DevgnSaam Tv
Published On: 

गिरिश कांबळे, साम प्रतिनिधी

Ajay Devgn: बॉलिवूड अभिनेता अजय देवगण सध्या दोन कारणांमुळे चर्चेत आहे. एकीकडे त्याचा ‘दृश्यम ३’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. तर दुसरीकडे मात्र, त्याच्या मुंबईतील जुहू येथील बंगल्यावर मुंबई महापालिकेने काम थांबवण्याची नोटीस बजावत कारवाई केली आहे.

अजय देवगणच्या बंगल्याबाबत नेमका वाद काय?

अजय देवगणचा जुहू येथील कपोल को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी परिसरातील बंगला सध्या चर्चेत आहे. या बंगल्यात सुरु असलेल्या कामावरून वाद निर्माण झाला आहे. सोसायटीने यासंदर्भात मुंबई महापालिकेकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर बीएमसीच्या के-वेस्ट विभागाने संबंधित जागेच्या व्यावसायिक वापरासाठी आवश्यक परवानग्या आणि कागदपत्रे मागितली.

Ajay Devgn
Jailer 2: 'जेलर 2' च्या शेवटच्या ५ मिनिटांत मोठा ट्विस्ट! विजय सेतुपतीच्या एंट्रीमुळे तिसऱ्या भागाची रंगली चर्चा

या कामासाठी आवश्यक परवानग्या न घेतल्याचे लक्षात आल्यामुळे मुंबई महापालिकेने 10 सप्टेंबर 2026 रोजी मुंबई महानगरपालिका कायद्याच्या कलम 354A अंतर्गत नोटीस बजावत काम तातडीने थांबवण्याचे आदेश दिले होते. पण, काम थांबवण्याचे आदेश देऊनही काम सुरु असल्याने पालिकेने कारवाई करत अनधिकृत बांधकामाचा काही भाग पाडला.

Ajay Devgn
Madhuri Dixit: धकधक गर्लचा जलवा; माधुरी दीक्षितचा निळ्या साडीतील दिलखेचक लूक व्हायरल

'दृश्यम ३'ची बॉक्स ऑफिसवर किती कमाई?

दरम्यान, अजय देवगणच्या ‘दृश्यम ३’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. सॅकनिल्कच्या १७ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या अपडेटनुसार, चित्रपटाने भारतात आतापर्यंत सुमारे ३३६ कोटी रुपये नेट कमाई केली आहे. भारतातील ग्रॉस कमाई ४०२.६६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर, परदेशातील ग्रॉस कमाई ११७.५० कोटी रुपये झाली आहे. त्यामुळे या चित्रपटाने जगभरातील एकूण ग्रॉस कमाई सुमारे ५२०.१५ कोटी रुपये झाली आहे. हे आकडे अद्ययावत होत असून अंतिम आकडे बदलू शकतात.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com