Nivedita Saraf: एक तास मतदान केंद्रांवर हेलपाटे...; निवडणूक आयोगाच्या भोंगळ नियोजनावर निवेदिता सराफ संतापल्या

Nivedita Saraf: BMC निवडणूक 2026 दरम्यान अभिनेत्री निवेदिता सराफ यांना मतदानासाठी एक तास चकरा माराव्या लागल्या. निवडणूक आयोगाच्या भोंगळ व्यवस्थापनावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
Nivedita Saraf Talk On BJP
Nivedita SarafSAAM TV
Published On

Nivedita Saraf: मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणूक 2026 सध्या जोरात सुरु आहे आणि आज (15 जानेवारी) सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र, मतदान केंद्रांवरील व्यवस्थेविषयी नाराजी व्यक्त करणाऱ्या नागरिकांमध्ये आता मराठी अभिनेत्री निवेदिता सराफ यांचाही समावेश झाला आहे. अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी निवडणूक आयोगाच्या दुर्बल व भोंगळ नियोजनावर संताप व्यक्त केला आहे.

निवेदिता सराफ यांनी सांगितलं की त्या विलेपार्ले येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी गेल्या होत्या. मात्र, त्या मतदान यादीत त्यांचे नावच दिसले नाही. कर्मचाऱ्यांनी सांगितले की त्यांना दुसऱ्या केंद्रावर जावं लागेल. पण, तेथे पोहोचण्याआधी सर्व मतदान अधिकारी निघून गेले होते आणि कोणताही स्पष्टीकरण मिळालं नाही. यामुळे त्यांना सुमारे एक तास मतदार केंद्रावर चकरा माराव्या लागल्या, तसेच संपूर्ण प्रक्रियेतील गोंधळामुळे त्यांचा रोष व्यक्त केला.

Nivedita Saraf Talk On BJP
Akshay Kumar: 'बाबा खूप कर्जात बुडालेत'; मतदानासाठी आलेल्या अक्षय कुमारला मुलीने मागितली मदत, व्हिडिओ व्हायरल

निवेदिता सराफ म्हणाल्या, “मी मतदानासाठी वेळेवर पोहोचले पण मतदार यादीत माझं नाव नव्हतं; ते दुरुस्त करण्यासाठी सांगितलं तर सर्व कर्मचारी निघून गेले. नाव आहे तर सिरीज नंबरच नाही असा गोंधळ सुरु आहे. त्यांनी मोबाईल आतमध्ये नेण्यास परवानगी न मिळाल्याने व्हिडिओ किंवा फोटोही काढता आला नाही, असे म्हणत निवडणूक आयोगाच्या भोंगळ नियोजनाचा संताप त्यांना व्यक्त केला.

Nivedita Saraf Talk On BJP
Gujrati actress On Election: गाफील राहून चालणार नाही...; गुजराती अभिनेत्रीचा अस्खलित मराठीमध्ये मोलाचा सल्ला

एकंदरीत, या लोकल बॉडी निवडणुकीतील निवडणूक आयोगाचे भोंगळ नियोजनावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. निवेदिता सराफ यांच्यासह अनेक नागरिकांनी चुकीच्या नियोजनाबद्दल वेगवेगळ्या माध्यमांद्वारे नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com