Mumbai Accident: अभिनेत्री मानसी नाईकच्या EX पतीचा भीषण अपघात; Video viral

Pradeep Kherara Accident: मॉडेल आणि बॉक्सर प्रदीप खरेरा याचा अपघात झालाय. या अपघातात त्याची पत्नीही जखमी झालीय. या घटनेची माहिती त्याने खुद्द व्हिडिओच्या माध्यमातून दिलीय.
Pradeep Kherara Accident
Pradeep Khera, ex-husband of actress Mansi Naik, injured in a shocking rickshaw accident – video goes viralsaam tv
Published On
Summary
  • अभिनेत्री मानसी नाईकच्या एक्स पती प्रदीप खरेराचा भीषण अपघात.

  • प्रदीप आणि त्यांची पत्नी किरकोळ जखमी, रिक्षाचालक गंभीर जखमी.

  • अपघातानंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

अभिनेत्री मानसी नाईकच्या एक्स पती प्रदीप खरेरा आणि त्याच्या पत्नीचा गंभीर अपघात झालाय. या अपघातात ते जखमी झालेत. अपघातानंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. प्रदीप खरेरा एका रिक्षातून प्रवास करत असताना त्यांच्या अपघात झाला. यात प्रदीपला आणि त्याच्या पत्नीला किरकोळ जखमा झाल्यात, पण रिक्षाचालक गंभीर जखमी झालाय. प्रदीप खरेराने एक व्हिडिओ शेअर करून या घटनेची सविस्तर माहिती दिलीय.

शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये प्रदीप म्हणाला, तो आणि त्याची पत्नी विशाखा मुंबईतील रस्त्यावरून रिक्षाने जात होते. एका ओला कारने त्यांच्या रिक्षाला धडक दिली. प्रदीप खरेराने त्या कार चालकाला पकडलं. कार चालक दारू प्यायला होता. चालकाच्या तोंडातून दारूचा वास येत होता, त्याला नीट उभाही राहू शकत नव्हता. देवाची कृपा होती म्हणून त्यांना जास्त काही लागले नाही, पण रिक्षाचालक बेशुद्ध पडला होता, असं प्रदीप खरेरा आपल्या व्हिडिओमध्ये म्हणतात दिसत आहे.

Pradeep Kherara Accident
Akshay Kumar: अक्षय कुमारचा दिलदारपणा; पूरग्रस्तांना केली ५ कोटींची मदत, म्हणाला 'ही माझी...

रिक्षाचालक ७० वर्षांचे होते आणि ते या वयातही रिक्षा चाल. या वयात काम करत आहेत, म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असेल. तुमच्या दारूच्या नादात एक चांगला माणूस मरेल.” प्रदीपने व्हिडिओ मार्फत सगळ्यांना विनंती केली आहे की, जर दारू प्यायची असेल, तर बाहेर फिरू नका, घरीच थांबा. प्रदीप खरेरा एक मॉडेल आणि बॉक्सर आहे. तो आणि मानसी नाईक यांचे लग्न काही वर्षांनी मोडले. त्यानंतर प्रदीपने सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर विशाखा जाटनीसोबत दुसरे लग्न केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com