हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
रील बनवताना तब्येत बिघडली
चाहत्यांमध्ये आणि इंडस्ट्रीत शोककळा
लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका सिरोहीचं हृदयविकाराच्या झटक्यान निधन झालं आहे. ३० व्या वर्षीच अभिनेत्रीचं निधन झाल्यानं मनोरंजन क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री उशिरा अभिनेत्रीला तिच्या घरी हृदयविकाराचा झटका आला. दिव्यांका रील बनवत तिला हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर ती जमिनीवर कोसळली. त्यानंतर अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी तिला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं, परंतु रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी दिव्यांकाला मृत घोषित केलं.
दिव्यांकाच्या निधनाची बातमी ऐकून चाहत्यांना धक्क बसला आहे. हरियाणवी संगीत आणि चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी अद्याप कोणतंही अधिकृत निवेदन जारी केलेलं नाही. दरम्यान हाती आलेल्या माहितीनुसार, दिव्यांकावर बुधवारी सकाळी गाझियाबादमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
मूळची उत्तर प्रदेशातील बुलंदशहरची असलेली दिव्यांका सध्या तिच्या आई-वडिलांसोबत आणि आजीसोबत गाझियाबादमध्ये राहत होती. तिने चौधरी चरण सिंग विद्यापीठातून बीसीए आणि त्यानंतर सिक्कीममधून एमबीएची पदवी मिळवली होती. तिच्या पश्चात तिचा भाऊ हिमांशू आणि बहिणी दीपांशू व जसमीत आहेत.
दिव्यांका मूळची बुलंदशहरची असून तिने आपल्या कठोर परिश्रमानं आणि चिकाटीनं हरियाणवी मनोरंजन विश्वात स्वतःचं स्थान निर्माण केलं. आपल्या कारकिर्दीत दिव्यांकानं लोकप्रिय हरियाणवी कलाकार मासूम शर्मा यांच्यासोबतही काम केलंय. सोशल मीडियावरही ती खूप सक्रीय होती. इंस्टाग्रामवर त्याचे १३ लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. तिचा सिनेसृष्टीतील प्रवास टिकटॉकने सुरू झाला होता. त्याच्या अनेक व्हिडिओंमुळे तिला ओळख मिळाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.