'कशाला करताय हे सर्व, मरण जेव्हा याययचंय तेव्हा...'; इच्छामरणावर आधारित 'आता वेळ झाली'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज

Aata Vel Zaali Marathi Movie Trailer: दिलीप प्रभावळकर आणि रोहिनी हट्टगंडी यांचा 'इच्छामरण' या एका शब्दावर आधारलेल्या 'आता वेळ झाली' चित्रपटाचा नुकताच दमदार ट्रेलर प्रदर्शित झालेला आहे.
Aata Vel Zaali Trailer
Aata Vel Zaali TrailerYou Tube

Aata Vel Zaali Movie Trailer Out

गेल्या काही दिवसांपूर्वीच दिलीप प्रभावळकर आणि रोहिनी हट्टगंडी यांच्या 'आता वेळ झाली' चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. आजवर प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटाचा पोस्टरच आला होता. अखेर चित्रपटाचा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. खूप वेगळे कथानक असलेल्या या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा होत आहे. 'इच्छामरण' या एका शब्दावर आधारलेल्या 'आता वेळ झाली' चित्रपटाचा नुकताच दमदार ट्रेलर प्रदर्शित झालेला आहे. (Marathi Film)

(actor dilip prabhavalkar and actress rohini hattagandi starrer aata vel zali marathi movie trailer released in social media)

Aata Vel Zaali Trailer
'बिग बॉस १७'च्या रियुनियन पार्टीत Munawar Faruquiचा Jamal Kudu गाण्यावर धमाल डान्स; सेम टू सेम बॉबी देओलसारखा धरला ठेका

वयस्क व्यक्तींच्या आयुष्यात अस्तित्त्ववादाची कोडी गहन होतात आणि त्यांना आपल्या आयुष्याचा अंत सुखमय व्हावा, असे वाटू लागते. ‘आता वेळ झाली’ या मराठी चित्रपटाची कथा अशाच एका खऱ्या घटनेवर आधारित आहे. 'इच्छामरण' या शब्दावरून प्रत्येक व्यक्तीचे वेगवेगळे मतप्रवाह आहेत. (Marathi Actors)

प्रत्येकाला 'इच्छामरण'ची वेगवेगळे कारणं असतात. जर तुम्हाला तुमचा शेवट आनंद हवा असेल तर तुम्हाला तुमची कथा कुठे संपवायची, हे माहित असणे आवश्यक आहे. आयुष्यात हे सूत्र जपणाऱ्या पासष्टी पार केलेल्या शशिधर लेले आणि रंजना लेले यांची इच्छामरणाची परवानगी मिळवण्यासाठीची धडपड यात दिसत आहे. समाजाचा या विषयाप्रती असलेला दृष्टिकोन बदलणारा हा चित्रपट आहे. (Marathi Actress)

चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये, दिलीप प्रभावळकर, रोहिणी हट्टंगडी यांच्यासह भारत दाभोळकर, सुरेश विश्वकर्मा, स्मिता तांबे, जयंत वाडकर, अभिनव पाटेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

डेल्ल्लास आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (सर्वोत्कृष्ट अभिनेता), राजस्थान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक) आणि लोकप्रिय जागरण चित्रपट महोत्सव, शारजाह फिल्म प्लॅटफॅार्म इंटरनॅशनल फेस्टिव्हलमध्ये ज्युरी अवॅार्ड यांसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवांसाठी 'आता वेल झाली' या चित्रपटाची यापूर्वीच निवड झाली आहे. (Social Media)

या चित्रपटाचे दिग्दर्शन अनंत नारायण महादेवन यांनी केले असून इमेजीन एंटरटेन्मेंट अँड मीडिया, अनंत नारायण महादेवन फिल्म्स यांच्या सहयोगाने 'आता वेळ झाली' या चित्रपटाचे दिनेश बंसल, जी. के. अग्रवाल आणि अनंत महादेवन निर्माते आहेत. (Entertainment News)

Aata Vel Zaali Trailer
Snehal Shidam News: शाहिद- क्रितीच्या 'TBMAUJ' मध्ये झळकली 'ही' मराठमोळी अभिनेत्री, पोस्ट शेअर करत दिली माहिती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com