Snehal Shidam News: शाहिद- क्रितीच्या 'TBMAUJ' मध्ये झळकली 'ही' मराठमोळी अभिनेत्री, पोस्ट शेअर करत दिली माहिती

Snehal Shidam Debut Bollywood Industry: 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्रीने शाहिद आणि क्रितीच्या 'तेरी बातों मैं उल्झा जिया' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं आहे.
Snehal Shidam In Kriti Senon And Shahid Kapoor TBMAUJ Film
Snehal Shidam In Kriti Senon And Shahid Kapoor TBMAUJ FilmSaam Tv
Published On

Snehal Shidam In Kriti Senon And Shahid Kapoor TBMAUJ Film

'चला हवा येऊ द्या' फेम स्नेहल शिदम कायमच अभिनयासाठी आणि हटक्या कॉमेडीमुळे कायमच चर्चेत असते. तिने फक्त कॉमेडी शोमध्येच नाही तर, मराठी चित्रपटांमध्ये, मालिकेंमध्ये काम केले आहे. नुकतेच अभिनेत्रीने आपल्या चाहत्यांना एकद सुख:द धक्का दिला आहे. अभिनेत्रीने शाहिद आणि क्रितीच्या 'तेरी बातों मैं उल्झा जिया' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं आहे. याबद्दलची माहिती अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित दिली आहे. (Bollywood)

अभिनेत्री स्नेहल शिदमने नुकतंच सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. अभिनेत्रीने याबद्दलची माहिती देताच तिच्यावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचा आणि शाहिद कपूरचा फोटो शेअर केला आहे. फोटोमधील दोघांचाही हा लूक चित्रपटातील दिसतोय. (Bollywood Film)

Snehal Shidam In Kriti Senon And Shahid Kapoor TBMAUJ Film
Rama Raghav Serial: 'रमा राघव' मालिका रंजक टप्प्यावर; स्वतःच्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी रमा काय करणार?

अभिनेत्रीने फोटो शेअर करताना कॅप्शन दिले की, "कळवायला उशीर आणि आनंद दोन्हीही होतोय. शाहिद कपूर आणि क्रिती सेनन यांचा नवा हिंदी चित्रपट "तेरी बातो में ऐसा उलझा जिया" नुकताच प्रदर्शित झाला आहे. यात माझी एक छोटीशी भुमिका आहे. तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा चित्रपट आणि कसा वाटतोय ते सांगा. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असच राहुद्या..." असं म्हणत अभिनेत्रीने आपली पोस्ट शेअर केली आहे. सोबतच #firstmovie #hindi #shahidkapoor #kritisanon असे हॅशटॅग्स वापरत तिने फोटो शेअर केलेत. (Social Media)

अभिनेत्रीच्या ह्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटी मित्रांनी कमेंट करत तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टवर ऋतुजा बागवे, निखिल बने सह अनेक सेलिब्रिटींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच आम्ही तुझ्यासाठी हा चित्रपट आवर्जुन बघू अशी कमेंटही एका चाहत्याने केली. अभिनेत्रीच्या ह्या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव केला आहे. अभिनेत्रीने आपल्या सिनेकारकिर्दित 'चला हवा येऊ द्या', 'देवमाणूस २', 'माझा होशील ना', 'भागो मोहन प्यारे' सारख्या मालिकेंमध्ये आणि 'बॉईज ३' चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. (Marathi Actress)

Snehal Shidam In Kriti Senon And Shahid Kapoor TBMAUJ Film
Navra Maza Navsacha 2: 'नवरा माझा नवसाचा २' च्या शुटिंगचा झाला श्री गणेशा, सचिन पिळगांवकर यांनी शेअर केला व्हिडिओ

'तेरी बातों मध्ये उलझा जिया' ने पहिल्या दिवशी ६ कोटींची दमदार कमाई केली आहे. दीपिका आणि हृतिकच्या 'फायटर'पेक्षा पहिल्याच दिवशी 'तेरी बातों मध्ये उलझा जिया'ने उत्तम कमाई केली आहे. चित्रपटामध्ये शाहिद कपूर आणि क्रिती सेननची लव्हस्टोरी चित्रपटामध्ये दाखवली आहे. ॲक्शन, रोमान्स आणि कॉमेडीचा जबरदस्त तडका असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित जोशी आणि आराधना साहने केले आहे. या चित्रपटामध्ये शाहिद आणि क्रिती व्यतिरिक्त बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देखील असणार आहे. त्याच्यासोबत डिंपल कपाडिया आणि राकेश बेदी देखील या चित्रपटाचा एक भाग आहेत. (Entertainment News)

Snehal Shidam In Kriti Senon And Shahid Kapoor TBMAUJ Film
Navra Maza Navsacha 2: 'नवरा माझा नवसाचा २' च्या शुटिंगचा झाला श्री गणेशा, सचिन पिळगांवकर यांनी शेअर केला व्हिडिओ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com