Rama Raghav Serial: 'रमा राघव' मालिका रंजक टप्प्यावर; स्वतःच्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी रमा काय करणार?

Rama Raghav Serial Latest Episode: येत्या महारविवारी आणि सोमवारी कलर्स मराठीवरील ‘रमा राघव’ मालिकेमध्ये प्रेक्षकांना मनोरंजनाचा दुहेरी धमाका अनुभवायला मिळणार आहे.
Rama Raghav Serial
Rama Raghav SerialSaam Tv
Published On

Rama Raghav Serial Special Episode

मालिका कायमच प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय असतो. मालिकेचे कथानक, मालिकेमध्ये सुरु असलेला ट्वीस्ट कायमच चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असतो. गेल्या अनेक दिवसांपासून कलर्स मराठीवर टेलिकास्ट होणारी ‘रमा राघव’ मालिका आपल्या कथानकामुळे प्रचंड चर्चेत आली आहे. नुकताच मालिकेमध्ये एक नवा ट्वीस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. (Tv Serial)

येत्या महारविवारी आणि सोमवारी प्रेक्षकांना मनोरंजनाचा दुहेरी धमाका प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. मालिकेत संस्काराने बदलेल्या रमाच्या आयुष्याचा नवा टप्पा या महारविवारी (११ फेब्रुवारी) सुरू होणार असून या माघी गणपती विशेष भागात ‘श्री गणेशा’च्या दैवी संकेताने रमा पौरोहित्याचा वसा घेणार आहे. हा रंजक टप्पा कसा उलगडणार हा प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय आहे. (Serial)

Rama Raghav Serial
Mithun Chakraborty Hospitalized: ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती बिघडली, कोलकात्यातील रुग्णालयात उपचार सुरू

‘रमा राघव’ मालिकेत येत्या महारविवारी अर्थात ११ फेब्रुवारीला आणि सोमवारी १२ फेब्रुवारीला मनोरंजनाचा दुहेरी धमाका प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. प्रेक्षकांना माघी गणपती विशेष भागात ‘श्री गणेशा’च्या दैवी संकेताने रमा पौरोहित्याचा वसा घेणार आहे, हा रंजक टप्पा कसा उलगडणार हा प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय आहे. (Marathi Film Industry)

रमाने उचलेले हे पाऊल पुरोहित कुटुंबासाठी घेतलेला हा धाडसी निर्णय तितकाच आव्हानात्मक असून त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीला रमा कशी सामोरी जाणार ? या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना सोमवारीच मिळणार आहे. घरातली स्त्री ज्ञान देणारी सरस्वती, समृध्दी देणारी लक्ष्मी असते. सोबतच ती घराच्या संरक्षणासाठी दुर्गा बनते, हा रमाचा विचार आणि त्यासाठी तिने घेतलेला दुर्गावतार प्रेक्षकांना येत्या रविवारच्या भागात पाहायला मिळणार आहे. (Colors Marathi)

Rama Raghav Serial
Lal Salaam 1st Day Collection: पहिल्याच दिवशी थलैवा रजनीकांतच्या 'लाल सलाम'ची बत्ती गूल ?, कमावले केवळ 'इतके' कोटी

रमा पात्र साकारणाऱ्या ऐश्वर्या शेटेने भूमिकेबद्दल सांगितले की, "या महारविवारपासून प्रेक्षकांना मालिकेत नवं वळण पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत मालिकेमध्ये माझे वेगळे पात्र होते. मालिकेमध्ये आता वेगळे वळण मिळाल्यापासून माझीही वेगळी भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मालिकेमध्ये रमा दुर्गा रुपात पाहायला मिळणार आहे. स्वतःच्या कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी हे रूप तिने घेतलं आहे. हे पात्र माझ्यासाठी खूप प्रेरणादायी ठरले." ‘रमा राघव’च्या एकत्र प्रवासातला हा उत्कंठावर्धक टप्पा नात्यांचे नवे पदर उलगडत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ठरेल." (Entertainment News)

Rama Raghav Serial
Anushka Sen Buy New Home: ‘बालवीर’ फेम अभिनेत्रीने साकार केलं स्वप्न; वयाच्या २१ व्या वर्षीच कोट्यवधींचं घर खरेदी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com