Aai Kuthe Kay karte Update: ईशाचं कन्यादान कोण करणार? लग्नाच्या धामधुमीत देशमुखांच्या घरातलं टेंशन काही संपेना

Aai Kuthe Kay Karte Latest Update: 'आई कुठे काय करते'च्या आजच्या भागात ईशा आणि अनिश लग्नासाठी लग्नमंडपर्यंत पोहोचलेले दिसणार आहेत.
Aai Kuthe Kay Karte 28 August Update
Aai Kuthe Kay Karte 28 August UpdateSaam TV
Published On: 

Aai Kuthe Kay Karte 29 August Episode:

'आई कुठे काय करते' ही मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय मालिका आहे. प्रेक्षक या मालिकेवर किती प्रेम करतात हे आपल्याला मालिकेच्या टीआरपीवरून लक्षात येईल.

मालिकेने नुकतेच १००० भाग पूर्ण केले आहेत. तसेच या मालिकेत रंजक वळण पाहायला मिळत आहे. ईशा आणि अनिशचा पुन्हा लग्न होणार आहे. चला पाहूया मी काय आहे आजच्या भागात खास?

'आई कुठे काय करते'च्या आजच्या भागात ईशा आणि अनिश लग्नासाठी लग्नमंडपर्यंत पोहोचलेले दिसणार आहेत. भागाच्या सुरुवातीला अप्पा, अनिरुद्धाला ईशाच्या लग्नासाठी मंडपात ये आणि जमाल तर तीच कन्यादान कर असं सांगतात.

Aai Kuthe Kay Karte 28 August Update
Sunny Deol Breaks Silence: सनी देओल ५० कोटी मानधन घेण्याच्या चर्चेवरून इंडस्ट्रीत 'गदर रिटर्न्स', शेवटी स्वतःलाच खरं काय ते सांगावं लागलं

अरुंधती ईशाला गौरीहर पूजनाचं महत्त्व काय असतं हे सांगत असते. ईशा अगदी मनापासून ही पूजा करते. त्यानंतर ईशा, अरुंधतीला अनिशचे आई-बाबा येणार नाहीत का? अजून का आले नाहीत? असं विचारते. अनिशने ईशाला सांगितलं असत की, जोपर्यंत आई-बाबा येणार नाहीत तोपर्यंत तो लग्न करणार नाही. त्यामुळे ईशा काळजी करत असते.

दरम्यान आशुतोष, अनिश घेऊन देशमुखांच्या दारापर्यंत येतो. पण अनिष्ट मंडपात येण्यास तयार नसतो. 'आई-बाबा आल्याशिवाय मी लग्न करणार नाही, मला ती चूक पुन्हा करायची नाही' असं अनिष्ट म्हणतो. यामुळे सगळेच टेन्शनमध्ये येतात.

अरुंधती मात्र अनिशची बाजू घेते आणि त्याला साथ देते. अरुंधती म्हणते, आधीच ईशा-अनिशने पळून जाऊन लग्न केलं आहे. जर पुन्हा या दोघांनी अनिशच्या आई-वडिलांशिवाय लग्न केलं तर ते अजून दुखावले जातील. विजय आणि वनितानि ईशा-अनिशला कधी माफ करावं हे सर्वस्वी ते दोघे ठरवतील.

अनिश देखील ईशाला समजावतो असं म्हणतो. तेवढ्यात विजय आणि वनिता तिथे येतात. आई-वडिलांच्या येण्याने अनिश खूप इमोशनल होतो.

लेकाच्या लग्नासाठी आलेल्या विजय-वनिताचा राग अजिबात गेलेला नसतो. विजय म्हणतो की, 'त्यांनी पळून जायची हिंमत आहे तर शून्यातून संसार उभा करण्याची तयारी देखील असेल. आमच्या संपत्तीतील एकही रुपयावर अनिश-ईशाचा अधिकार नसेल.'

अनिश आई-वडिलांच्या सर्व अति मान्य करतो आणि त्याला फक्त त्यांच्या विश्वास आणि आशीर्वाद हवे आहे असं म्हणतो. अनिशच्या या समजूतदारपणाचा श्रेष्ठ वनिता, अरुंधतीला देते.

लग्नविधींना सुरुवात होताच अनिरुद्ध तिथून निघून जातो. जेव्हा गुरुजी मुलीच्या आई-वडिलांना बोलावतात तेव्हा अरुंधती-आशुतोष पुढे येतात. अखेर 'आई कुठे कुठे करते'मध्ये तो क्षण येतो. मुलीच्या कन्यादाना वेळी बापाच्या काळजाला पाझर फुटतो आणि अनिरुद्ध तिथे येतो. ईशा धावत जाऊन त्याला मिठी मारते. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.