Aai Kuthe Kay Karte Latest Episode
Aai Kuthe Kay Karte Latest EpisodeSaam TV

Aai Kuthe Kay Karte Episode Update: अनिरुद्धमुळे केळकर कुटुंबात नवीन वादळ? आशुतोषची बहीण वीणासोबत अनिरुद्ध करणार...

Marathi Serials Latest Update: अनिरुद्धचे सरप्राईज पाहून सर्वांना धक्का बसतो.

Marathi Aai Kuthe Kay Karte New Twist: 'आई कुठे काय करते' या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहेत. ही मालिका टीआरपीमध्ये देखील अव्वल आहे. मालिकेत सध्या यशाच्या साखरपुड्याची लगबग आहे. त्यात ईशाच्या मागण्या आणि अपेक्षांमुळे देशमुख कुटुंबीय हतबल झाले आहेत. या सगळ्यात आता अनिरुद्ध सर्वांना नवीन धक्के देणार आहे.

'आई कुठे काय करते' या मालिकेच्या आजच्या भागाचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोमध्ये दाखविण्यात आले आहे की, ईशा-अनिशचा साखरपुडाला सगळे जमलेले असतात आणि अनिरुद्ध सर्वांना एक सरप्राईज देतो. अनिरुद्धचे सरप्राईज पाहून सर्वांना धक्का बसतो. चला तर मग पाहूया काय आहे अनिरुद्धचे सरप्राईज. (Latest Entertainment News)

Aai Kuthe Kay Karte Latest Episode
The Kerala Story 5th Day Box Office Collection: 'द केरला स्टोरी'ने अवघ्या ५ दिवसात केली हाफ सेंच्युरी; वादामुळे होतोय का चित्रपटाला फायदा?

ईशा-अनिश एकमेकांना अंगठी घालतच अनिरुद्ध घराबाहून येतो. आणि त्याच्या बिसनेस पार्टनरची सर्वांशी ओळख करून देतो. अनिरुद्धची ही पार्टनर दुसरी तिसरी कोणी नसून आशुतोष केळकरची बहीण वीणा असते. अनिरुद्धच्या वीणाची ओळख करून देताच सर्वांना धक्का बसतो.

वीणा पाहून अरुंधती आशुतोषला सांगते, 'आशुतोष माझं मन मला सांगतय, अनिरुद्ध विनाच वापर करून आपल्या कुटुंबात वादळ आणू पाहतायेत.' वीणाला पाहून आशुतोष आधीच शॉक झालेला असतो. अरुंधतीलने दिलेल्या सूचक इशाराने त्याची काळजी अजून वाढते. आशुतोषच्या चेहऱ्यावर वीणा आणि अनिरुद्ध यांच्या मैत्रीमुळे वाढलेली काळजी आणखी वाढते.

अभिनेत्री खुशबू तावडे हे 'वीणा'च्या भूमिकेत दिसणार आहे. वीणाच्या येण्याने 'आई कुठे काय करते' मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे हे निश्चित. अनिरुद्ध-वीणाचा वापर करून केळकर कुटुंबात काय नवीन वादळ आणणार हे आपल्याला येत्या भागात पाहायला मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com