The Kerala Story 5th Day Box Office Collection: 'द केरला स्टोरी'ने अवघ्या ५ दिवसात केली हाफ सेंच्युरी; वादामुळे होतोय का चित्रपटाला फायदा?

The Kerala Story Box Office Collection: 'द केरला स्टोरी' चित्रपटाने ५ दिवसात ५० कोटींचा आकडा पार केला आहे.
The Kerala Story Box Office Collection
The Kerala Story Box Office CollectionSaam TV

The Kerala Story Completed Half Century: 'द केरला स्टोरी' हा चित्रपट ५ मे रोजी प्रदर्शित झाला. परंतु चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटावरून वाद निर्माण होण्यास सुरूवात झाली. तसेच चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी देखील करण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये तर चित्रपट बॅन केला आहे. चित्रपटाला विरोध होत असला तरी चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन कमी झालेले नाही.

'द केरला स्टोरी' या चित्रपटाला भारतातील दाक्षिणात्य भागातून सुरुवातीपासूनच खूप विरोध होत होता. अगदी केरळच्या मुख्यमंत्र्यांनी देखील या चित्रपटाला विरोध होत होता. परंतु भारतातील इतर भागात (पश्चिम बंगाल वगळता) उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अनेक संघटना या चित्रपटाला पाठिंबा देत आहेत. तसेच अनेक्क सेलिब्रिटी देखील या चित्रपटाचे समर्थन करत आहेत. (Latest Entertainment News)

The Kerala Story Box Office Collection
The Kerala Story Controversy: प्रसिद्ध अभिनेत्याने ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचा जोडला थेट रामदास स्वामींशी संबंध; व्हिडिओ व्हायरल

चित्रपटाला होणार विरोध चित्रपटाच्या यशाचे कारण ठरलं आहे असे म्हटले जात आहे. तसेच चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचा आलेख देखील दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या चित्रपटाने ५ दिवसात ५० कोटींचा आकडा पार केला आहे.

चित्रपट समीक्षक तरणआदर्श यांनी ट्विट करत 'द केरला स्टोरी' चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची क्रमवारी दिली आहे. 'द केरला स्टोरी' चित्रपटाने अर्धशतक पूर्ण केले आहे. शुक्रवारी या चित्रपटाने 8.03 कोटी, शनिवारी 11.22 कोटी, रविवारी 16.40 कोटी, सोमवारी 10.07 कोटी, मंगळवारी 11.14 कोटी. इतकी कमाई या चित्रपटाने केली आहे. 'द केरला स्टोरी' या चित्रपटाचे एकूण बॉक्स कलेक्शन 56.86 कोटी इतके झाले आहे.

सुदीप्तो सेन दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी' या चित्रपटात 3 महिलांची कथा दाखवण्यात आली आहे, ज्यांचे ब्रेनवॉश करून त्यांना इस्लामिक धर्म स्वीकारण्यास भाग पडले जाते आणि त्यांचा ISIS या दहशतवादी संघटनेत समावेश केला जातो.

ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादात अडकला होता. अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com