ए.आर. रहमानचा मुलगा ए.आर. अमीनचा भीषण अपघात
चेन्नईच्या गिंडी परिसरात रोड अपघात
अमीन आणि त्याच्या मित्राला किरकोळ दुखापत
उपचारानंतर ए.आर. अमीनला डिस्चार्ज देण्यात आला
AR Rahman’s Son A.R. Ameen Injured In Chennai Road Accident मनोरंजन सृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानचा मुलगा आणि गायक आणि संगीत निर्माता ए.आर. अमीन याचा चेन्नईमध्ये रोड एक्सिडेंट झाला. सुदैवाने या अपघातात अमीनला केवळ किरकोळ दुखापत झाली असून, रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईच्या गिंडी परिसरात पहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. अमीन आपल्या पोर्श कारमधून जात होता. त्याच्यासोबत त्याचा एक मित्रही होता. यावेळी रॅपिडोची वॅगन-आर कार साइड रोडवरून मुख्य रस्त्यावर येत असताना तिची अमीनच्या कारला धडक झाली. पोलिसांच्या माहितीनुसार, वॅगन-आर मुख्य रस्त्यावर येत असताना हा अपघात घडला.
या घटनेत अमीन आणि त्याच्या मित्राला किरकोळ दुखापत झाली. दोघांनाही तातडीने कावेरी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. उपचारानंतर अमीनला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. दुसरीकडे, वॅगन-आरमधील व्यक्तीलाही दुखापत झाली असून त्याला कलैग्नर सेंटेनरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
अमीनसोबत याआधीही एक मोठी दुर्घटना घडली होती. २०२३ मध्ये गाण्याच्या शूटिंगदरम्यान क्रेनला लावलेला जड झुंबर आणि ट्रस अचानक त्याच्यावर कोसळला होता. सुदैवाने त्यावेळीही तो थोडक्यात बचावला. अमीन हा संगीत क्षेत्रात प्लेबॅक सिंगर आणि म्युझिक प्रोड्यूसर असून, ‘दिल बेचारा’ आणि ‘2.0’ यांसारख्या चित्रपटांसाठी त्याने गाणी गायली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.