हिंगोली रेल्वे स्टेशन परिसरात तरुणावर प्राणघातक हल्ला
हल्ल्याचा CCTV फुटेज समोर
जीव वाचवण्यासाठी पळालेल्या तरुणावर पुन्हा हल्ला
जखमी तरुणावर नांदेड येथे उपचार सुरू
संदीप नागरे, हिंगोली
हिंगोलीच्या रेल्वे स्टेशन परिसरात एका तरुणावर तीन जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. चाकूने सपासप वार करताना ही संपूर्ण घटना रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे जीवाच्या आकांताने पळणाऱ्या जखमी तरुणाने रेल्वे स्टेशन परिसरातील पार्किंग कार्यालयात धाव घेत मदतीसाठी याचना केली. मात्र तिथे देखील हल्लेखोर दाखल झाले आणि त्यांनी पुन्हा एकदा हातातील धारदार खंजरने वार सुरू केल्याचे या CCTV फुटेज मध्ये दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आदित्य शंकर सूर्यवंशी असून तो हिंगोली शहरातील रहिवाशी असल्याची माहिती हिंगोली शहर पोलिसांनी सांगितली आहे. त्यांच्या मानेवर, पोटात आणि हातावर चाकूचे खोलवर वार असल्याने त्याच्यावर नांदेडच्या खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर हल्ला करणाऱ्या तरुणांची देखील पोलिसांनी ओळख पटवली असून प्रथम कुरे, अरबाज जिद्दी ,आणि विकास खंदारे अशी तिन्ही आरोपी तरुणांची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या तिघांनी हल्ला केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला आहे. त्यामुळे आता पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत. मात्र या तरुणावर जीवघेना हल्ला कोणत्या कारणाने झाला याचं कारण अद्याप अस्पष्ट असल्याचं पोलिसांनी सांगितले असून आरोपीच्या अटकेनंतरच हल्ल्याचे कारण पुढे येणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.