Uttar Pradeh Crime News: भयंकर घटना! महिलेला विवस्त्रावस्थेत धावत्या ट्रेनमधून गंगा नदीत फेकलं

Crime News: कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेला विवस्त्रावस्थेत धावत्या ट्रेनमधून पुलावरून थेट गंगा नदीत फेकलं. यात ही महिला जखमी झाली आहे.
Uttar Pradesh Crime News
Uttar Pradesh Crime NewsSAAM TV
Published On

Woman Thrown from Moving Train:

कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेला विवस्त्रावस्थेत धावत्या ट्रेनमधून पुलावरून थेट गंगा नदीत फेकलं. यात ही महिला जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये गंगा घाटाजवळ असलेल्या रेल्वेमार्गाजवळ नाविकांना एक महिला जखमी अवस्थेत सापडली. ही महिला विवस्त्रावस्थेत होती. ती सातत्याने रडत होती. नाविकांना ही महिला घाबरलेल्या अवस्थेत दिसली. त्यांनी लगेच याबाबतची माहिती गंगा घाटावरील पंडा राजू यांना दिली. पंडा राजू यांनी या महिलेची मदत करत तिला लगेच कपडे आणून दिले. तसंच तिला तात्काळ रुग्णालयात नेलं. तिची विचारपूस केली. तिच्यासोबत नक्की काय घडलं याची माहिती घेतली. (Ganga Ghat) (Latest News)

या महिलेसोबत जे घडलं, ते ऐकून धक्काच बसला. विचारपूस केल्यानंतर या पीडित महिलेनं तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. मंगळवारी सकाळी ६ ते ७ च्या सुमारास ती ट्रेनमधून प्रवास करत होती. त्यावेळी काही लोकांनी तिला धावत्या ट्रेनमधून धक्का दिला. त्यामुळं ती पुलावरून थेट गंगा नदीपात्रात पडली. परंतु सुदैवानं यावेळी नदीपात्रात पाणी कमी होते. त्यामुळं ती कशीबशी किनाऱ्यावर पोहोचण्यात यशस्वी झाली. तिचा जीव वाचला. पीडित महिलेनं दिलेल्या माहितीच्या आधारे राजू यांनी पोलिसांना कळवले.

महिलेवर उपचार सुरू

पोलिसांनी या महिलेला तुमच्यासोबत काही गैरप्रकार घडला आहे का? असं विचारलं. यावर मात्र ही महिला काही स्पष्टपणे उत्तर देऊ शकली नाही. घडलेल्या या प्रकारामुळे तिला मोठा मानसिक धक्का बसला आहे. ही महिला काही बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सध्यातरी या महिलेवर उपचार सुरू आहेत. तिच्यासोबत काही गैरप्रकार घडलेला आहे किंवा नाही, हे जाणून घेण्यासाठी या पीडित महिलेची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे.

Uttar Pradesh Crime News
Punjab Crime: पंजाबमध्ये डीएसपींची गोळ्या झाडून हत्या, रस्त्याच्या कडेला सापडला मृतदेह; परिसरात खळबळ

शरीरावर अनेक ठिकाणी जखमा

महिलेची मदत करणाऱ्या पंडा राजू यांनी सांगितलं की, त्यांनी पहिल्यांदा या महिलेला पाहिलं तेव्हा ती खूप घाबरलेली होती. तिच्या शरीरावर कपडे नव्हते. तसंच शरीरावर अनेक ठिकाणी जखमांच्या खुणा होत्या. तिला 80 फूट उंचावरून खाली फेकलं गेलं होतं. त्यामुळं तिला दुखापत झाली आहे. तो पूल उन्नाव पोलिसांच्या हद्दीत येत आहे. या संदर्भात माहिती घेऊन पीडितेला रेल्वेतून का फेकण्यात आले, कोणी फेकले? याची माहिती घेतली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

Uttar Pradesh Crime News
Pune Crime News: पुण्यात टोळक्यांचा हैदोस सुरूच; 31 डिसेंबरच्या रात्री दोघांना बेदम मारहाण, परिसरात दहशत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com