WhatsApp युझर्स सावधान! अनोळखी ग्रुप जाईन कराल तर गमवाल बॅक बॅलन्स

WhatsApp Investment Scam: तुम्ही व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सायबर क्राइम करणारे व्हॉट्सअपवर ग्रुप तयार करुन गुंतवणूकदारांना आपलं लक्ष्य करत आहेत.
WhatsApp युझर्स सावधान! अनोळखी ग्रुप जाईन कराल तर गमावल बॅक बॅलन्स
WhatsApp Investment Scam
Published On

सायबर क्राइम करणारे व्हॉट्सअ‍ॅपद्वारे लोकांना गंडा घालत आहेत. व्हॉट्सॲपवर ग्रुप बनवून लोकांची आर्थिक फसवणूक करत आहेत. या ॲपवरून फसवणूक करण्याचे प्रकार झपाट्याने वाढत आहेत. दररोज व्हॉट्सॲपच्या माध्यमातून युजर्ससोबत फसवणुकीच्या बातम्या येत आहेत. नुकतेच मुंबईतील एक प्रकार समोर आलाय. त्यामुळे जर तुम्ही कोणत्या अनोळखी ग्रुपमध्ये सामील होत असाल किंवा झाला तर सावधान.

सायबर फ्रॉड करणाऱ्यांनी एक गुंतवणूक अ‍ॅप तयार करत यामध्ये लोकांना फसवत त्यांना आर्थिक गंडा घालत आहेत. मुंबईतील एका गुंतवणूकदाराला अधिक लाभ देण्याचं आमिष दाखवत त्याची ९० लाख रुपयांची फसवणूक केलीय. इंडियन एक्स्प्रेस या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या आर्थिक फटका बसलेला व्यक्ती एका बनावट विदेशी तज्ञांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील झाला होता. हे बनावट तज्ज्ञ गटातील सदस्यांना कमी वेळेत अधिक नफा मिळविण्यासाठी गुंतवणुकीच्या टिप्स द्यायचे.

लुबाडणारे लोक गुंतवणूक करण्याचे अनेक शानदार पर्याय देत. या त्यांच्या या टिप्स ऐकून बळी ठरलेल्या व्यक्तीने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि बनावट व्हॉट्सअ‍ॅपच्या ग्रुपमध्ये सामील झाले. ग्रुपमध्ये अॅड होताच त्यांनी या व्यक्तीला 'Institutional Trading Account' उघडण्यास प्रवृत्त केलं. तसेच युजरला प्ले स्टोअरवरून मोबाईल ॲप डाउनलोड करण्यास सांगितलं. ॲप डाउनलोड केल्यानंतर सायबर गुन्हेगारांनी युझरला कंपनीच्या बँक खात्यात ९० लाख रुपये जमा करण्यास सांगितले. युझर्सचा विश्वास जिंकण्यासाठी फसवणूक करणाऱ्यांनी युझरच्या खात्यात १५.६९ कोटी रुपयांचा नफा दाखवला. जेव्हा या युझर्सने त्याच्या खात्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला पैसे काढण्यास अडचणी येऊ लागल्या.

काही केल्या पैसे निघत नसल्याचं समजताच आपण फसवलो गेल्याचं युझर्सच्या लक्षात आलं. त्यानंतर फसवणूक करणाऱ्यांनी युझरला ब्लॉक केलं आणि पैसे हवे तर नफ्यातील १० % पैशाचा वाटा द्यावा लागेल अशी मागणी करण्यास सुरुवात केली. व्हॉट्स

व्हॉट्सअ‍ॅपमधून आपली फसवणूक होऊ नये म्हणून काय कराल?

गुंतवणुकीचे प्लान आणि अनोळखी नंबरवरून आलेल्या ऑफर असलेल्या मेसेजवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. अस्सल गुंतवणूक कंपन्या असे बनावट मेसेज पाठवून वापरकर्त्यांना योजनेची माहिती देत ​​नाहीत.

गुंतवणुक करण्याआधी ओळख पडताळून पाहा.कोणी ओळखीचं असेल तर त्या ग्रुपमध्ये राहा.

जर अशा एखाद्या व्हॉट्सअ‍ॅपवरून कोणी व्यक्ती मेसेज करत असेल किंवा कॉल करत गुंतवणूक करण्यास सांगत असेल तर लगेच सतर्क व्हा.

कोणत्याच प्रकारचा प्लान घेऊ नका. अन्यथा मोठं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

WhatsApp युझर्स सावधान! अनोळखी ग्रुप जाईन कराल तर गमावल बॅक बॅलन्स
Pink WhatsApp Scam : व्हॉट्सअॅप पिंकच्या फंदात पडाल तर कंगाल व्हाल...काय आहे नेमका झोल?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com