अक्षय बडवे, प्रतिनिधी...
Pune Fraud News: गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये ऑनलाईन फसवणूकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. ऑनलाईन फसवणूक करण्यासाठी सायबर चोरटे नवनवीन शक्कल लढवताना दिसत आहेत.
ज्यामध्ये अनेकजणांची लाखोंची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. शहरात आणखी एक सर्वात मोठा फसवणूकीचा प्रकार उघडकीस आला असून एका निवृत्त कर्नलला कोट्यवधींचा गंडा घालण्यात आला आहे. (Pune News)
याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील (Pune) लष्करातील एका निवृत्त कर्नलला तब्बल तीन कोटी रुपयांना सायबर चोरट्यांनी (Cyber Crime) गंडा घातल्याचे समोर आले आहे. पुण्यातील बंड गार्डन परिसरात राहणाऱ्या या कर्नलला चांगले पैसे परत मिळणार असल्याचे आमिष दाखवून लुबाडण्यात आल्याचे उघड झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, निवृत्त कर्नल यांना वॉट्सअपवर एक मेसेज आला. यामध्ये ऑनलाईन रिव्ह्यू लिहण्यासाठी आणि व्हिडीओ लाईक करुन भरपूर पैसे मिळवण्याची ऑफर देण्यात आली. सुरवातीला त्यांच्या खात्यात काही पैसे जमा सुद्धा झाले. त्यानंतर त्यांना प्री पेड टास्क स्कीममध्ये पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले गेले. (Latest Marathi News)
सायबर चोरट्यांच्या आमिषाला बळी पडून कर्नल अधिकाऱ्यांनी तब्बल विविध १८ खात्या मध्ये पैसे भरले. त्यांच्याकडे असलेली बचत आणि निवृत्तीनंतर मिळालेले पैसे त्यांनी त्यामध्ये गुंतवले. मात्र आपली फसवणूक होते आहे हे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. परंतु तोपर्यंत कर्नल यांचे तब्बल ३ कोटी रुपये सायबर चोरट्यांनी गायब केले होते. या प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे. (Pune Crime News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.