Nashik News: नाशिकमध्ये खळबळ! आरोपीचा कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न; अंबड पोलीस ठाण्यातील धक्कादायक प्रकार

Accused Try To End Life in Ambad Police Custody: आरोपीने कोठडीतील फरशीच्या साहाय्याने हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
Nashik Ambad Police Station
Nashik Ambad Police StationSaamtv
Published On

तबरेज शेख, प्रतिनिधी....

Ambad Police Station Nashik News: नाशिक शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या अंबड पोलिस स्टेशनमधील आरोपीने कोठडीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime News In Marathi)

Nashik Ambad Police Station
Washim Crime News: पतीचा बायकोसह दोन मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला, थोड्याशा जमिनीसाठी पोटच्या पोराला संपवलं

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये (Nashik) आरोपीने कोठडीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. विशाल कुऱ्हाडे असे या आरोपीचे नाव आहे.

आरोपीने कोठडीतील फरशीच्या साहाय्याने हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर आरोपी विरोधात अंबड पोलिस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

Nashik Ambad Police Station
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; पिकअपची ट्रकला मागून धडक, अपघातात एक ठार

वाशिम जिल्ह्यात खळबळ....

 वाशिममध्ये एका व्यक्तीने पत्नी आणि दोन मुलावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात पत्नी आणि एक मुलगा गंभीर जखमी झाला, तर मोठया मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हरिओम घोडके असे मृत मुलाचे नाव आहे असून नंदू घोडके असे आरोपीचे नाव आहे. मंगरूळपिर तालुक्यातील ईचोरी येथे ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com