Washim Crime: संतापजनक! मुलींची छेड काढणाऱ्या टोळक्याला हटकल्याने शिक्षकाला मारहाण; वाशिममधील घटना

Washim News: वाशिममध्ये शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्या टोळक्याला हटकल्याने शिक्षकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Washim Crime: संतापजनक! मुलींची छेड काढणाऱ्या टोळक्याला हटकल्याने शिक्षकाला मारहाण; वाशिममधील घटना
Washim News: Saamtv
Published On

मनोज जयस्वाल, वाशिम|ता. २७ ऑगस्ट २०२४

बदलापूरमधील घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली असतानाच राज्यात महिला अत्याचाराच्या घटना थांबत नसल्याचे चित्र दिसत आहे. बुलढाण्यानंतर पुणे, कोल्हापूर, नागपूरमधून महिला अत्याचाराच्या गंभीर घटना समोर आल्या होत्या. अशातच वाशिममध्ये शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्या टोळक्याला हटकल्याने शिक्षकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Washim Crime: संतापजनक! मुलींची छेड काढणाऱ्या टोळक्याला हटकल्याने शिक्षकाला मारहाण; वाशिममधील घटना
Pune Police Attack: जिगरबाज पठ्ठ्या! 'सर लवकर बरं व्हायचंय, त्यांना पकडायचंय', कोयता हल्ल्यातील जखमी APIने दाखवली हिंमत

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बसस्थानकावर विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या टोळक्याला हटकल्याने शिक्षकाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार वाशिमधून समोर आला आहे. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील रिठद येथील ही घटना असून याप्रकरणी वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

रिठद येथील श्री शिवाजी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुली एसटी बसने शाळेत ये जा करतात. त्यांना बस स्थानकावर सोडण्यासाठी गेलेल्या मारुती भिसडे या शिक्षकानं तिथे असलेल्या चिडीमारी करणाऱ्या मुलांच्या टोळक्याला हटकले असता त्या मुलांनी शिक्षक मारुती भिसडे यांना मारहाण केली. याप्रकरणी वाशिमच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून ठाणेदार श्रीदेवी पाटील या प्रकाराची पुढील तपास करत आहेत.

Washim Crime: संतापजनक! मुलींची छेड काढणाऱ्या टोळक्याला हटकल्याने शिक्षकाला मारहाण; वाशिममधील घटना
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांची मोठी खेळी; नाशिकमध्ये महाविकास आघाडीचं टेन्शन वाढणार

दरम्यान, बदलापूर येथील चिमुरड्या मुलींवर झालेला अत्याचार आणि कोलकाता येथील महिला डॉक्टरच्या निर्घृण हत्येचा निषेध करत अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा गावात कॅन्डलमार्च काढण्यात आला. महिला शक्ती कायद्याची अंमलबजावणी केली जावी हि मागणी करत निघालेल्या या कॅन्डलमार्चमध्ये महिला आणि तरूण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली.

Washim Crime: संतापजनक! मुलींची छेड काढणाऱ्या टोळक्याला हटकल्याने शिक्षकाला मारहाण; वाशिममधील घटना
Akola Crime News: गर्लफ्रेंडच्या एक्स बॉयफ्रेंडवर तरुणाचा चाकूहल्ला, भरस्त्यात थरार, पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com