NRI Assassination: NRI वर जीवघेणा हल्ला; मुलांच्या देखत NRI वर हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या, Video व्हायरल

Punjab NRI Firing Case : पंजाबमध्ये दिवसाढवळ्या एका एनआरआयची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडलीय. दोन व्यक्तीने गोळ्या झाडल्या. मुलं हल्लेखोरांना थांबवत होते, परंतु हल्लेखोरांनी त्याची आई व मुले आरोपींना थांबवत राहिल्या, मात्र ते न पटल्याने ही घटना घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
NRI Assassination: NRI वर जीवघेणा हल्ला; मुलांच्या देखत NRI वर हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या, Video व्हायरल
Published On

पंजाबमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. चोरट्यांनी घरात घुसून अनिवासी भारतीयावर भरदिवसा गोळ्या झाडल्याची घटना घडलीय. हल्लेखोरांनी आई आणि मुलासमोरच गोळीबार केलाय. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आह. हल्लेखोर गोळ्या झाडत असताना मुलं हात जोडून 'काका पप्पाला मारू नका' अशी विनंती करत होते. परंतु हल्लेखोरांना त्यांची कीव आली नाही आणि त्यांनी त्या मुलांच्या वडिलांवर गोळ्या झाडल्या.

ही धक्कादायक घटना पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील एका गावात घटना घडली. दोन हल्लेखोर दुचाकीवरून आले आणि नंतर एनसीआयच्या घरात घुसले. आरोपींनी बंदुक काढत एनआरआय सुखचैन सिंगवर 3 गोळ्या झाडल्या. यावेळी आई आणि मुलगा हल्लेखोरांकडे दयेची याचना करत होते. मात्र हल्लेखोरांनी त्यांचं ऐकलं नाही.

एनआरआय सुखचैन सिंग हे अमेरिकेत राहतात. ते काही दिवसांसाठी त्यांच्या गावी आले होते. हल्लेखोरांनी गोळीबार केल्यानंतर ते जखमी झालेले असून एनआरआयला रुग्णालयात दाखल केलंय. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलंय. एनआरआयची पत्नी अमनदीप कौर यांनी सांगितले की, हल्लेखोर घरात घुसले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला. एनआरआयच्या आधीच्या पत्नीच्या कुटुंबीयांनी हा हल्ला केला असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केलीय.

शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांनी X वर पोस्ट करून या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलीय. शनिवारी सकाळी अमृतसर साहिबच्या दुबुर्जी येथे राहणारे एनआरआय सुखचैन सिंग यांच्या घरावर बदमाशांनी गोळीबार केलाय. आई आपल्या मुलाला वाचवण्यासाठी हात जोडतेय आणि निष्पाप मुल बापाला वाचवण्यासाठी हात जोडत आहे, पण निर्दयी बदमाश ऐकत नाहीत. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या राज्यात रोज अशा घटना घडत आहेत, पंजाबी घरातही सुरक्षित नाही, असा आरोप त्यांनी केलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com