Crime News: मला...! मधुचंद्राच्या रात्री नववधूची विचित्र मागणी, बायकोचं बोलणं ऐकताच नवऱ्याला सुटला घाम

Uttar Pradesh News: पत्नीने आणि तिच्या कुटुंबीयांमुळे तरुण नैराश्यात गेलाय. नवरी मुलगी त्याला घटस्फोट घेण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकत आहे.
Uttar Pradesh News
Uttar Pradesh Newssaam Tv
Published On

नव जोडप्याची पहिली मधुचंद्राची रात्र पण, त्याच रात्री नवरीनं केलेल्या विचित्र मागणीमुळे नवरदेवाला धक्का बसला. नवरीची मागणी ऐकून नवरदेवानं थेट पोलीस स्टेशन गाठलं. ही विचित्र घटना उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये घडलीय. बरेलीमधील बारादरी येथील एका तरुणाचं जानेवारी महिन्यात लग्न झालं होतं. लग्नाच्या पहिल्या रात्री नवरीनं त्याच्याकडे विचित्र मागणी केली. नवरीची मागणी ऐकून नवदेवाला घाम सुटला.

या तरुणाला नवरीने तिच्या आयुष्यातील एक किस्सा सांगितला. हा किस्सा ऐकल्यानंतर नवरदेवाला धक्का बसला. नवरीचं बोलणं ऐकल्यानंतर नवरदेवाने त्यांच्या घरच्यांनाही नवरीच्या प्रेम प्रकरणाची माहिती दिली. हा किस्सा ऐकून नवरदेवाच्या घरातील सदस्यांनाही मोठा धक्का बसला. मधुचंद्राच्या रात्रीपासून नवरीनं नवरदेवापासून दूर राहणं सुरू केलं. त्यानंतर घरच्यांशी चर्चा केल्यानंतर नवरदेवानं थेट पोलीस स्टेशन गाठत नवरीविरोधात तक्रार नोंदवली आहे.

Uttar Pradesh News
BJP Worker: माझ्या कुटुंबाकडे लक्ष द्या.., पक्षाच्या नावे चिठ्ठी; भाजप कार्यकर्त्यानं ऑफिसमध्येच संपवलं आयुष्य

काय आहे प्रकरण

जानेवारी महिन्यात या तरुणाचं लग्न झालं होतं. आपल्या नव्या संसाराची स्वप्न घेऊन नवरदेव आणि नवरीने घरात प्रवेश केला. पण मधुचंद्राच्या रात्री नवरीनं नवऱ्याला वेगळचं सत्य सांगितलं. ते ऐकून नवरदेवाच्या पायाखालची जमीन सरकली. मधुचंद्राच्या रात्री नवरीने नवरदेवाला तिच प्रेम प्रकरण असल्याचं सांगितलं. मी दुसऱ्यावर प्रेम करते.

घरच्यांनी माझं जबरदस्तीने लग्न करण्यास भाग पाडलं. मला हात लावू नको, नवरीचं हे बोलून ऐकून नवरदेवाला धक्का बसला. त्यादिवसापासून नवरी नवरदेवापासून दूर राहते. 'मला सोडून दे, नाहीतर मी तुझ्या वडिलांवर विनयभंगाचा आरोप करेन. त्यांना तुरुंगात टाकेन', अशी धमकी नवरी मुलगी देते. त्यामुळे पीडित मुलगा नैराश्यात गेलाय.

Uttar Pradesh News
Shocking: देवदर्शनावरून आली, बसमध्येच मुलांसमोर आईवर सामूहिक बलात्कार; कंडक्टर, चालक अन् हेल्परचं सैतानी कृत्य

त्यानंतर मुलाने नवरीने सांगितलेली प्रेम प्रकरणाची गोष्ट त्यांच्या घरच्यांना सांगितली. त्याचबरोबर त्याने मुलीच्या घरच्यांनाही याची माहिती दिली. पण मुलीच्या घरच्यांनी नवरदेवालाच शिवीगाळ केली. तिच्या घरचे त्याला नवरीसोबत संसार करण्यास नवऱ्यावर दबाव टाकत आहेत. पण नवरीला नवरदेवासोबत राहायचं नाहीये. त्यामुळे मुलाने नवरी मुलगी आणि तिच्या घरच्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com