उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे. ही तुम्हाला एखाद्या सिनेमाची स्टोरी वाटेल. मात्र खरंच एकतर्फी प्रेमातून ही घटना घडली आहे. रामपुर जिल्ह्यातील टांडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सैदनगरमध्ये 13 मार्चच्या रात्री मृतदेह सापडला. यावेळी त्याच्या मृतदेहाशेजारीच मोटरसायकल आढळून आली होती. पहिल्यांदा पाहिल्यानंतर हा एखादा रस्ते अपघात वाटत होता. मात्र त्यामागे कहाणी काही वेगळीच होती.
या मृतदेहाच्या गळ्यावर आणि चेहऱ्यावर असलेल्या जखमांमुळे पोलिसांना संशय आला. त्यानंतर करण्यात आलेल्या पोस्टमार्टम अहवालात गळा दाबल्यामुळे म्हणजेच स्ट्रँग्युलेशनमुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर या प्रकरणाने वेगळंच वळण घेतलं.
तपासादरम्यान पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक खुलासा झाला. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब समोर आली ती म्हणजे, मृत व्यक्तीची हत्या ही त्याच्या स्वतःच्या भाच्यानेच केली होती.
वीरेंद्र नावाच्या या आरोपीने आपल्या मित्र जितेंद्र उर्फ छोटूच्या मदतीने त्याच्या मामाच्या हत्येचा हा कट रचला होता. पोलिसांनी केलेल्या चौकशीतून समोर आलं की, वीरेंद्रला आपल्या मामाच्या पत्नीवर म्हणजेच मामीवर एकतर्फी प्रेम होतं. यावेळी मामा आड येत असल्यामुळे त्याने त्याला कायमचं संपवण्याचा निर्णय घेतला.
अपर पोलीस अधीक्षक अनुराग सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ही हत्या अगदी प्लान करून केली होती. वीरेंद्रने आपल्या मामाला शेतात नेलं आणि तिथे त्याला भरपूर बीयर पाजली. यावेळी मामा पूर्णपणे नशेत गेल्यानंतर वीरेंद्र आणि त्याचा मित्र यांनी मफलरच्या साहाय्याने त्याचा गळा आवळून त्याची हत्या केली.
गुन्हा केल्यानंतर आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी वेगळीच योजना आखली. त्यांनी मृतदेह मोटरसायकलवर ठेवला दोघांनी बाइक सुरू केली. त्यानंतर ती रस्त्याच्या कडेला पाडली. यामुळे ही घटना अपघातासारखी दिसावी असा त्यांचा उद्देश होता. मात्र पोलिसांच्या तपासणीत आणि पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये भाच्याचा डाव उघड झाला.
दरम्यान या प्रकरणात पोलीसांनी भाचा आणि त्याचा मित्र अशा दोघांना अटक केली आहे. शिवाय त्या दोघांनाही न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.