Social Media मधील मैत्रीने केला घात, अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दाेघांना अटक

Palghar Crime News : समाज माध्यमातून मैत्री झाल्यानंतर त्यातील एका मित्राची आणि तिची घट्ट मैत्री जडली. त्यातूनच तिच्या मित्राने तिला भेटण्याचा आग्रह केला अन् घात झाला.
talasari police arrests two for molesting minor girl
talasari police arrests two for molesting minor girlSaam Digital

समाज माध्यमातून मैत्री झाल्यानंतर एका 15 वर्षीय मुलीवर दाेघांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यात घडली. या घटनेची माहिती पाेलिसांपर्यंत पीडितेने पाेहचवताच तिच्या तक्रारीची नाेंद घेत पोलिसांनी दोन्ही संशयितांचा तपास करीत त्यांना बेडया ठाेकल्य़ा. तलासरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार संशयितावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra News)

तलासरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार संबंधित मुलीची समाज माध्यमातून दाेघांशी मैत्री झाली. त्यातील एका मित्राची आणि तिची घट्ट मैत्री जडली. त्यातूनच तिच्या मित्राने तिला भेटण्याचा आग्रह केला.

talasari police arrests two for molesting minor girl
नागपूर शहरात सलग तीन दिवस भूकंपाच्या धक्क्याची नोंद, अफवांवर विश्वास ठेवू नका : भूगर्भ वैज्ञानिक सर्वेक्षण विभाग

दाेघांची एका ठिकाणी भेट झाली. संबंधित युवकाने तिला त्याच्या घरी नेत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतरही अनेकदा तिच्यावर अत्याचार झाल्याचे तिने तक्रारीत म्हटलं आहे. दरम्यानच्या काळात तिच्या मित्राने अन्य एका युवकाच्या साथीने पीडितेवर अत्याचार केला. ही बाब पीडितेच्या कुटुंबियांना समजताच त्यांनी पाेलिसांत धाव घेतली. पाेलिसांनी या प्रकरणी दाेघांना अटक केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

talasari police arrests two for molesting minor girl
व्हिजन, मुद्दे नसल्यानेच विरोधकांकडून अपप्रचार सुरू : खासदार इम्तियाज जलील

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com