शेतात झोपलेल्या बापाला लेकानं संपवलं, लोखंडी पाईपने डोक्यावर अन् तोंडावर वार

Domestic Dispute Ends in Murder: नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील जातेगाव शिवारात मुलानेच झोपलेल्या वडिलांचा लोखंडी पाईपने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून दारूच्या व्यसनातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
Police investigation underway after a son allegedly killed his father with an iron pipe in Nashik district, Maharashtra.
Police investigation underway after a son allegedly killed his father with an iron pipe in Nashik district, Maharashtra.Saam Tv
Published On

अजय सोनवणे, साम टीव्ही

नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील जातेगाव शिवारात एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली असून, मुलानेच आपल्या जन्मदात्या वडिलांचा निर्घृण खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दारूच्या व्यसनातून निर्माण झालेल्या कौटुंबिक वादातून ही पितृहत्येची घटना घडल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Police investigation underway after a son allegedly killed his father with an iron pipe in Nashik district, Maharashtra.
Crime News: तिहेरी हत्याकांडानं लक्ष्मीनगर हादरलं; आई, बहीण आणि भावाच्या हत्येनंतर आरोपीनं पोलीस स्टेशन गाठलं

रविवारी रात्री च्या सुमारास विठ्ठल गायकवाड हे जेवण करून मळ्यातील खोलीत झोपण्यासाठी गेले असता रात्री 11.30 वाजताच्या सुमारास, मुलगा श्रीकृष्ण घरातून कोणालाही न कळवता मळ्यात गेला. वडील झोपेत असल्याची खात्री करून, खोलीतील लोखंडी पाईपने डोक्यावर, तोंडावर व ओठांवर जोरदार वार करत त्यांचा जागीच खून केला अशी कबुली त्याने स्वतःच दिली.

Police investigation underway after a son allegedly killed his father with an iron pipe in Nashik district, Maharashtra.
Crime: नवऱ्यासोबत कडाक्याचे भांडण, बायकोची सटकली; पोटच्या २ मुलांना विष पाजलं

घरगुती भांडणाच्या कारणाचा राग मनात धरून मुलाने वडिलांच्या डोक्यात लोखंडी पाईप घालून खून केल्याची घटना रविवारी (दि. ४) रात्री उशिरा नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे घडली. संशयिताने वडिलांचा अज्ञाताकडून खून झाल्याचा बनाव केला. पोलिसांनी अर्ध्या तासात घटनेचा उलगडा करत संशयितास ताब्यात घेतले.

जातेगाव येथील शेतकरी विठ्ठल तुकाराम गायकवाड (५८) यांचे त्यांचा मुलगा श्रीकृष्ण ऊर्फ सावता विठ्ठल गायकवाड (२०) यांच्यात भांडण झाले होते. सावता याने रागाच्या भरात झोपलेल्या वडिलांच्या डोक्यात लोखंडी पाईपने वार केला. यात विठ्ठल गायकवाड यांचा मृत्यू झाला. सोमवारी (दि. ५) सकाळी ही घटना उघड झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com