Shocking News: बाईक घेण्यासाठी माहेरून पैसे आण, सासरच्यांनी घरातून हाकललं; नवविवाहितीने संपवलं आयुष्य

Newlywed Woman Ends Life Over Dowry: नाशिकच्या देवळामध्ये सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. माहेरून पैसे घेऊन यावे यासाठी सासरची मंडळी या महिलेचा शारिरीक आणि मानसिक छळ करत होते.
Shocking News: बाईक घेण्यासाठी माहेरून पैसे आण, सासरच्यांनी घरातून हाकललं, नवविवाहितीने संपवलं आयुष्य
Nashik Shocking NewsSaam Tv
Published On

अजय सोनावणे, नाशिक

नाशिकच्या देवळामध्ये नवविवाहित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली. दुचाकी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा वारंवार मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. हा त्रास सहन न झाल्यामुळे अंबिका मयूर पवार या महिलेने आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना देवळा शहरातील इंदिरा नगरमध्ये घडली. या प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध देवळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबिका मयूर पवार या विवाहितीने आत्महत्या केली. सात महिन्यांपूर्वीच अंबिकाचे लग्न झाले होते. पण लग्नानंतर सासरची मंडळी तिचा छळ करू लागले. बाईक घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत या मागणीसाठी अंबिकाचा पती, सासू, सारे आणि नणंद तिला त्रास देत होते. या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून अंबिकाने आत्महत्या केली. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी अंबिकाच्या नवरा, सासू, सासरे आणि नणंद या चौघांना अटक केली.

Shocking News: बाईक घेण्यासाठी माहेरून पैसे आण, सासरच्यांनी घरातून हाकललं, नवविवाहितीने संपवलं आयुष्य
Crime : बदलापूर हादरले, मुलगा बापाच्या जीवावर उठला, प्रॉपर्टीसाठी जीव घेतला

देवळा पोलिस ठाण्यात शंकर वसंत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अंबिकाचा पती मयूर अंबादास पवार, सासू निर्मला अंबादास पवार, सासरे अंबादास पंडित पवार आणि नणंद पिंकी अंबादास पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. या चौघांनी संगनमत करून अंबिकाला माहेरहून २०,००० रुपये आणण्यासाठी तगादा लावला होता. पैसे न मिळाल्याने तिला वेळोवेळी शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण करण्यात येत होती.

Shocking News: बाईक घेण्यासाठी माहेरून पैसे आण, सासरच्यांनी घरातून हाकललं, नवविवाहितीने संपवलं आयुष्य
Dombivli Crime: एअरपोर्टवर नोकरी देण्याचं आमिष, तरुणीवर बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार; डोंबिवलीच्या रिलस्टारचा प्रताप

३१ मार्च रोजी अंबिकाला मारहाण करून घरातून हाकलून दिले होते. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या आपल्या आईकडे ती गेली होती आणि १ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता अंबिकाने आपल्या आईच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आई सखुबाई हिने पाहताच तात्काळ दरवाजा तोडून तिला खाली उतरवले आणि उपचारासाठी सटाणा येथील रुग्णालयात दाखल केले.

प्रकृती गंभीर असल्याने तिला नाशिक येथे हलवण्यात आले होते. मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अंबिकाच्या नवऱ्यासह चार जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ८०, ८५, ११५(२), ३५२, ३५१(२), (३), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Shocking News: बाईक घेण्यासाठी माहेरून पैसे आण, सासरच्यांनी घरातून हाकललं, नवविवाहितीने संपवलं आयुष्य
Jalna Crime: सासूचा खून केला, मृतदेह गोणीत भरून निघून गेली; निर्दयी सूनेचा प्रताप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com