Crime : बदलापूर हादरले, मुलगा बापाच्या जीवावर उठला, प्रॉपर्टीसाठी जीव घेतला

Badlapur Crime : पैशासाठी मुलगा हैवान झाल्याची धक्कादायक घटना बदलापूरमध्ये घडली आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
Crime
CrimeSaam tv
Published On

मयुरेश कडाव

Badlapur Crime News : प्रॉपर्टीसाठी मुलाने जन्मदात्या बापाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना बदलापूरमध्ये घडली आहे. चाकूने केलेल्या हल्ल्यात अनंत कराळे यांचा मृत्यू झालाय. आरोपी मुलगा गणेश कराळे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रॉपर्टीच्या वादातून घटना घडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या घटनेनंतर बदलापूरमध्ये खळबळ उडाली आहे.

बदलापूरमध्ये मुलानेच वडिलांची हत्या केल्याची घटना घडली आहे. अनंत कराळे असं हत्या झालेल्या वडिलांचं नाव असून बेलवली परिसरात घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी मुलगा गणेश कराळे याला ताब्यात घेतलंय. पैसे आणि प्रॉपर्टीच्या वादातून हत्या करण्यात आल्याची शक्यता आहे. बेलवली परिसरात नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. बदलापूरमध्ये या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.

Crime
Pune Crime : मावळ हादरलं, अनैतिक संबंधातून २२ वर्षीय तरुणाचा घेतला जीव

बदलापूरच्या बेलवली परिसरात अनंत कराळे यांचा गाळा असून तो खान कॅटरर्स यांना भाड्याने दिला आहे. या गाळ्यात मुलगा गणेश कराळे आणि त्याचे वडील अनंत कराळे हे बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास आले होते. त्यानंतर भाडेकरूंना दुकानाच्या बाहेर काढून ते दुकानाच्या मागच्या बाजूला गप्पा मारण्यासाठी गेले. याच वेळेस त्यांच्यात वाद झाले आणि मुलाने वडिलांच्या पोटात धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात अनंत कराळे यांचा मृत्यू झाला.

Crime
Crime News: मोनालिसाला चित्रपटात काम देणाऱ्या दिग्दर्शकाला अटक; अत्याचार केल्याचा आरोप

बापाने पोराचा जीव घेतल्याची घटना बदलापूरमध्ये वाऱ्यासारखी पसरली. या घटनेची माहिती मिळताच बदलापूर पश्चिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून अनंत कराळे यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस अधिक तपास करत आहेत. पैशासाठी बापाचा जीव घेतल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com