
मुंबई एअरपोर्टवर नोकरी देण्याचे आमिष दाखवत डोंबिवलीच्या प्रसिद्ध रिलस्टारने बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी डोंबिवलीतील प्रसिद्ध व्यावसायिक आणि रील स्टार सुरेंद्र पाटील याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे डोंबिवलीमध्ये खळबळ उडाली आहे.
मानपाडा पोलिस ठाण्यात पोलिसांच्याच खुर्चीत बसून रील बनवल्या प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेला रिलस्टार सुरेंद्र पाटील याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे . पुण्यातील एका तरुणीला मुंबई एअरपोर्टमध्ये एअर होस्टेस म्हणून कामाला लावण्याचे आमिष दाखवून ऑफिसमध्ये बोलवून बलात्कार केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. त्यामुळे रिलस्टार अडचणीत आला आहे.
इतकेच नव्हे तर कागदपत्र देण्याच्या बहण्याने पुन्हा ऑफिसमध्ये बोलावून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. यावेळी तरुणीने विरोध केल्याने तिच्यावर चोरीचा आळ घेत तिला नग्न करून झडती घेण्याच्या बहाण्याने तिच्याशी अश्लील कृत्य केल्याचा आरोप देखील पीडितेने केला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी रिलस्टार सुरेंद्र पाटीलविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच सुरेंद्र पाटील फरार झाला असून मानपाडा पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
पीडित तरुणी पुण्यामध्ये राहते. ती पुणे एअरपोर्टमध्ये एका खासगी विमान कंपनीत एअर होस्टेस म्हणून काम करत होती . महिनाभरापूर्वी ती इन्स्टाग्राम चेक करत असताना तिला सुरेंद्र पाटील याचा एक रील दिसला. तिने हा रील लाईक केला. त्यानंतर सुरेंद्र पाटील यांनी तिच्याशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. तरुणीचा विश्वास संपादन करून तिचा मोबाईल नंबर मिळवला. या तरुणीला मुंबई एअरपोर्टमध्ये एअर होस्टेसची नोकरी मिळवून देतो असे आमिष दाखवून कागदपत्र घेऊन डोंबिवली येथे ऑफिसमध्ये बोलावले . तरुणी ऑफिसमध्ये येताच त्याने एका खोलीमध्ये तिला जाण्यास सांगितले.
एकांत साधून सुरेंद्र पाटीलने बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी कुठे सांगितल्यास तुझ्या आई-वडिलांना ठार मारेन असे धमकी देखील सुरेंद्र पाटीलने दिल्याचा आरोप तरुणीने केलाय. काही दिवसानंतर कागदपत्र घेण्याच्या बहाण्याने पुन्हा या तरुणीला सुरेंद्र पाटीलने डोंबिवलीत बोलवले. ऑफिसमध्ये येताच सुरेंद्र पाटीलने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने विरोध करताच सुरेंद्र पाटीलने तिच्यावर चोरीचा आळ घेतला. तिला नग्न करून तिची झडती घेत अश्लील कृत्य केले.
सुरेंद्र पाटीलच्या ड्रायव्हरने देखील तिला नग्न करून तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याचा आरोप पीडित तरुणीने केलाय. याप्रकरणी पीडितेने मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच सुरेंद्र पाटील पसार झाला आहे. मानपाडा पोलिस सुरेंद्र पाटील याचा शोध घेत आहेत. दरम्यान सुरेंद्र पाटील हा बांधकाम व्यवसायिक असून तो प्रसिद्ध रील स्टार आहे. याआधी देखील त्याच्या काही रिल्समुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्यात त्याचा हा नवा कारनामा समोर आल्यानंतर त्याच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.