
उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका तरुणाने आधी बायकोला घटस्फोट दिला नंतर तिच्यावर चाकूने हल्ला करत तिचे नाक कापले. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली. ही घटना मुरादाबादच्या माझोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मैनाथरमध्ये घडली. महिलेवर हल्ला केलानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी आधी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तिची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचारासाठी तिला मेरठमधील रुग्णालयात हलवण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांद मोहम्मद नावाच्या तरुणाने बायको राबियावर जीवघेणा हल्ला केला. राबिया मूळची कुंडरकी येथील रहिवासी आहे. राबियाचे चांदसोबत दुसरे लग्न होते. तिचे पहिले लग्न संभल जिल्ह्यातील चंदौसी येथील एका तरुणासोबत झाले होते. पण लग्नानंतर काही वर्षांनंतर तिच्या पहिल्या नवऱ्याने तिला घटस्फोट दिला. त्यानंतर तिच्या सासरच्यांनी तिला मैनाथरमध्ये एक घर घेऊन दिले. हे घर राबियाच्या दुसऱ्या नवऱ्याने म्हणजे चांदने विकत घेतले. राबिया आणि चांद प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी लग्न केले. त्यांना एक मुलगी देखील आहे.
राबियाच्या आईने सांगितले की, लग्नानंतर काही वर्षांनंतर चांदने राबियाला मारहाण करण्यास सुरूवात केली. तो तिच्या मुलांनाही जीवे मारण्याची धमकी द्यायचा आणि दररोज भांडण करायचा. शुक्रवारी चांदने घरामध्ये पेट्रोल ओतून आणि गॅस सिलिंडरचा पाईप काढून घरामध्ये आग लावण्याचा प्रयत्न केला. पण त्याला घरातील लोकांनी शांत केले. त्यानंतर त्याने राबियाला घटस्फोट दिला. याआधी देखील चांदने असे करण्याचा प्रयत्न केला होता.
शनिवारी सकाळी जेव्हा राबियाने चांदला कामावर जाण्याबद्दल विचारले तेव्हा तो रागावला. त्यावेळी तिची मुलगी जवळच्या दुकानात दूध आणण्यासाठी गेली होती. राबियाची मुलगी घरी परत आल्यानंतर ती जोरजोरात ओरडू लागली. तिचा आवाज ऐकून सर्वजण पळत आले. राबिया रक्ताच्या थारोळ्यात पडली होती आणि चांदच्या हातात चाकू होता. त्याने राबियाने नाक आणि ओठ कापला होता. त्यानंतर त्याने घरातून पळ काढला. स्थानिकांनी राबियाला रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. राबियाची प्रकृती गंभीर आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.