Chhatrapati sambhajinagar
Chhatrapati sambhajinagarSaam TV News

उद्योगपती लड्डांचा घात खास मित्रांनी केला, दरोडेखोरांना सगळं सांगितलं, संभाजीनगरात नेमकं काय घडलं?

Industrialist Santosh Ladda Robbery: संभाजीनगरात उद्योगपती संतोष लड्डा यांच्या घरावर दरोडा पडल्याप्रकरणी धक्कादायक खुलासा - त्यांचे मित्रच दरोडेखोरांना माहिती पुरवत होते. पोलिसांनी आतापर्यंत १० जणांना अटक केली असून तपास सुरू आहे.
Published on

Chhatrapati sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध उद्योगपती संतोष लड्ड्या यांच्या घरी काही दिवसापूर्वी मोठा दरोडा पडला होता. या प्रकरणी पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. लड्डाच्या मित्रांनीच दरोडेखोरांना सगळी माहिती दिल्याचे तपासातून उघड झाले आहे. दरोड्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १० जणांना अटक केली आहे. बाळासाहेब चंद्रकांत इंगोले या मित्राने लड्डा यांच्याबाबत आणि बिझनेस, घरातील माहिती दरोडेखोरांना दिल्याचे उघड झाले आहे.

लड्डा यांच्या घरी दरोडा टाकण्यासाठी दरोडेखोरांना संपत्तीची माहिती देणाऱ्या आरोपीसह दहा जणांना संभाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आज अटक केलेल्या आरोपीचे नाव देवीदास नाना शिंदे असं आहे. देवीदास शिंदे वाळूजमधीलच एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या बसवर चालक आहे. त्याला गुप्तधन, काळ्या जादूचा नाद असल्याचं तपासात समोर आलंय. तो हाजबेचा मित्र असून त्यांनी यापूर्वी अनेक वेळा गुप्तधनाच्या लालसेने खोदकाम केल्याचे स्थानिकांनी सांगितले.

Chhatrapati sambhajinagar
Maharashtra Govt : अवकाळीने होरपळलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारने नुकसान भरपाईचे नियमच बदलले

देवीदासला त्याच्या मित्राकडून लड्डा यांच्या घरात कोट्यवधींची रक्कम असल्याची माहिती मिळाली होती. लड्डा यांच्या घरातील संपत्तीविषयी वडगाव कोल्हाटीच्या शिवाजीनगरमध्ये राहणाऱ्या देवीदास नाना शिंदे याने माहिती देऊन दरोडा टाकण्यास सांगितल्याचे आता उघड झाले. हे पुराव्यानिशी निष्पन्न होताच गुन्हे शाखेने त्याला अटक केली. १५ मे रोजी लड्डा यांच्या घरावर पडलेल्या दरोड्याविषयी रोज नवे धक्कादायक खुलासे होत आहेत. सोमवारी रात्री दरोड्यातील प्रमुख सूत्रधार असलेल्या एमआयडीसी ठाण्यात अमोल बाबूराव खोतकर याचा गुन्हे शाखेने एन्काउंटर केला. तर त्याचे साथीदार योगेश सुभाष हाजबे, सय्यद अजहरोद्दीन सय्यद कबिरोद्दीन, महेंद्र माधव बिडवे, सुरेश ऊर्फ सूर्यकांत रामकिसन गंगणे, सोहेल जलील शेख यांची सध्या पोलिस कोठडीत कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, एनकाउंटर झालेल्या अमोलकडील सोने कोणाकडे आहे यासाठी पोलीस कसोशीने तपास करत आहेत.

Chhatrapati sambhajinagar
Shivsrushti : पुण्यात शिवसृष्टीमध्ये लाजिरवाणे कृत्य, बोर्डावर लघुशंका, व्हिडिओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com