सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी
Pune Ambegaon Shivsrushti News in Marathi : पुण्यातील आंबेगाव येथील शिवसृष्टी प्रकल्प परिसरातील शिवसृष्टीच्या बोर्डवर एका वयस्कर व्यक्तीने लघुशंका केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच शिवभक्तांमध्ये तीव्र संताप (Shivsrishti Pune controversy) पसरला आहे. लाजीरवणारे कृत्य करणाऱ्या वयस्कर व्यक्तीचे नाव अमोल कुलकर्णी असल्याचे समजतेय. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.
स्थानिक नागरिक आणि शिवसृष्टीच्या समर्थकांनी अमोल कुलकर्णी (Amol Kulkarni viral video) याच्या कृत्याचा तीव्र निषेध केला आहे. लाजिरवाणे कृत्य करणाऱ्या वयस्कर व्यक्तीचे नाव अमोल कुलकर्णी असल्याचे समजतेय. शिवभक्तांनी आणि स्थानिकांनी अमोल याला पकडून भारती विद्यापीठ पोलिसांच्या (Shivsrishti video outrage) ताब्यात दिलं. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे शिवसृष्टीच्या पावित्र्याला धक्का लागल्याची भावना शिवभक्तांमधून व्यक्त होत आहे. आशा लाजिरवाण्या कृत्यांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची मागणी शिवभक्तांनी केली आहे.
आंबेगाव येथील शिवसृष्टी प्रकल्प परिसरात असणाऱ्या शिवसृष्टीच्या बोर्डावर अमोल यानं लघुशंका केल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. आरोपीला मराठा समाजाने (Maratha community protest) काळे फासलं आहे. जमावाने अमोल कुलकर्णी याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांसमोर शिवभक्तांनी अमोल कुलकर्णी याला असं का केलं, म्हणून जाब विचारला. त्यावेळी वयस्कर व्यक्तीकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. पुणे पोलिसांनी जमावाला शांत करत अमोल कुलकर्णी याला ताब्यात घेतले आहे. भारती विद्यापीठ पोलीस (Bharati Vidyapeeth police case) या घटनेचा तपास करत आहेत. वयस्कर अमोल कुलकर्णी हे मतिमंद असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.