ऐन निवडणुकीत रक्तरंजित थरार! नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तरुणाचा भरदिवसा निर्घृण खून

Sangli College Corner Murder During Election Period: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ऐन निवडणुकीत सांगली शहरात तरुणाचा निर्घृण खून झाला. कॉलेज कॉर्नर परिसरात धारदार शस्त्रांनी वार करून हत्या करण्यात आली असून पोलीस तपास सुरू आहे.
Police personnel inspecting the crime scene near College Corner in Sangli after the brutal daylight murder of a youth on New Year’s Day.
Police personnel inspecting the crime scene near College Corner in Sangli after the brutal daylight murder of a youth on New Year’s Day.Saam Tv
Published On

विजय पाटील, साम टीव्ही

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आणि ऐन निवडणुकीच्या धामधुमीत सांगली शहरात तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पूर्ववैमनस्यातून तरुणाचा पाठलाग करत धारदार शस्त्रांनी वार करून त्याची हत्या करण्यात आली आहे. ही घटना सांगली शहरातील कॉलेज कॉर्नरजवळ, केडब्ल्यूसी कॉलेजच्या शेजारी भरदिवसा घडली. विष्णू वडेर (वय २३) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Police personnel inspecting the crime scene near College Corner in Sangli after the brutal daylight murder of a youth on New Year’s Day.
Crime: लग्नाचं खोटं आमिष, लॉजवर नेऊन महिलेवर बलात्कार; प्रायव्हेट फोटो व्हायरल करण्याची धमकी, पोलिसाचं हैवानी कृत्य

प्राथमिक माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी विष्णू वडेर याचा काही तरुणांसोबत वाद झाला होता. त्याच जुन्या वादातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच सांगली शहराचे पोलीस उपविभागीय अधिकारी आणि शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. तसेच आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून तपास सुरू आहे.

Police personnel inspecting the crime scene near College Corner in Sangli after the brutal daylight murder of a youth on New Year’s Day.
Gadchiroli Crime: पती ठरला प्रेमात अडसर; प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा केला गेम, नंतर रचला अपघाताचा बनाव

दरम्यान सांगलीच्या मिरजेमध्ये भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला झाल्याचा प्रकार घडला आहे. प्रभाग 3 मधील भाजप उमेदवार सुनीता व्हनमाने यांच्या घरावर हा हल्ला करण्यात आलाय. यावेळी व्हनमाने यांच्या घरावर तसेच त्यांचा मुलगा संदीप व्हनमाने यांच्यावर देखील हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला असून यावेळी हल्लेखोरांकडून व्हनमाने यांच्या घरासमोर असणाऱ्या चारचाकी व दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आलीये. उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी प्रतिस्पर्धी शिवसेना शिंदे पॅनलचे उमेदवार सागर वनखंडे यांच्या समर्थकांकडून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप संदीप व्हनमाने यांनी केला आहे.

मात्र संदीप व्हनमाने यांनी केलेले आरोप शिंदे सेनेचे उमेदवार सागर वानखडे यांनी फेटाळून लावलेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहानुभूती मिळवण्यासाठी विरोधकांनी असे बिनबुडाचे आरोप केलेत. तोडफोड करणाऱ्या संशयीतांसोबत त्यांचे असणाऱ्या पूर्वीच्या वादातून हा प्रकार घडला आहे. यामध्ये माझा काहीही संबंध नसल्याचे शिंदे सेनेचे सागर वनखंडे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com