Pune : पुणे पोलिसांनी आरोपींचा माज उतरवला, जिथं गुन्हा केला तिथेच काढली धिंड

Pune Crime News : जिथे गुन्हा केला, त्याच ठिकाणी पोलिसांनी आरोपींची धिंड काढत जिरवली आहे. पुणे पोलिसांनी आरोपींना धडा शिकवण्यासाठी मुळशी पॅटर्न राबवल्याची चर्चा होत आहे.
Pune Crime News
Pune Crime News
Published On

सचिन जाधव, पुणे

Pune Police Parade Criminals in Public : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेय. त्यामुळे आता पुणे पोलिसांकडूनही ठोस कारवाई करण्यात येत आहे. आरोपींना धडा शिकवण्यासाठी पुणे पोलिसांनी मुळशी पॅटर्न राबवलाय. जिथं गुन्हा केला तिथेच आरोपींची पुणे पोलिसांनी धिंड काढली आहे. गाड्यांची तोडफोड कऱणाऱ्या आणि वाहतूक पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी धिंड काढली आहे. पुणे पोलिसांनी त्या आरोपींचा माज उतरवल्याची चर्चा होत आहे.

जिथं गुन्हा केला, तिथेच धिंड काढली -

पुण्यात गाड्या तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलीसांनी धिंड काडली. फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत गाड्यांची तोडफोड करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली. गाड्यांची तोडफोड करत दहशत पसरवणाऱ्या आरोपींची धिंड काढण्यात आली. ज्या परिसरात गाड्या फोडल्या त्याच परिसरात आरोपींची पोलिसांकडून वरात काढण्यात आली.

Pune Crime News
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे दिल्लीत, नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा तिढा आज सुटणार, कोण नमतं घेणार?

पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन दिवसांपूर्वी करण्यात आरोपींकडून गाड्यांची तोडफोड आली होती.गाड्यांची तोडफोड करणाऱ्या चारही आरोपीला अटक करत पुणे पोलिसांनी धिंड काढली.

Pune Crime News
पुणे हादरले! जन्मदात्या आईनेच २ चिमुकल्यांचा बळी घेतला, झोपेतच गळा दाबला, पतीवरही कोयत्याने वार

पोलिसावर हल्ला करणाऱ्याची धिंड

वाहतूक पोलिसावर दगडाने हल्ला करून पळून जाणाऱ्या तरुणाला फुरसुंगी पोलिसांकडून अटक करण्यात आली. शनिवारी सायंकाळी ज्या चौकात हा प्रकार घडला त्याच चौकात त्याची धिंड काढून पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीला माफ करणार नाही असा संदेश दिला.

Pune Crime News
Pune : दिलासादायक! जीबीएसचा विळखा सैल, आतापर्यंत ८७ रूग्ण झाले ठणठणीत

आदिनाथ ऊर्फ बबलू भागवत मसाळ (वय २५,रा. कोलवडी,मुरकुटे वस्ती, मांजरी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.आदिनाथ हा गाडी चालवताना मोबाईलवर बोलत होता.यावेळी भेकराईनगर चौकात कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार राजेश गणपत नाईक (वय,४७ रा. जगताप नगर,वानवडी) यांनी त्याला अडवले आणि गाडी चावताना फोनवर बोलू नकोस असे सांगितले.यावेळी दोघांच्यात शाब्दिक चकमक झाली.याचा राग मनात धरून आरोपीने रस्त्याच्या बाजूला पडलेला दगड उचलून हवालदार नाईक यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले आणि घटना स्थळावरून पळून गेला होता त्याला उस्मानाबाद मधून ताब्यात घेतल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com