
सागर आव्हाड, साम प्रतिनिधी
पुण्यातील वाघोलीमध्ये धक्कादायक घटना घडलीय. हॉटेलचं बिल देण्याच्या वादावरून एका चालकाने दुसऱ्या चालकाचा खून केलाय. बिल देण्यावरून वाद झाल्यानंतर राग डोक्यात घेत कंटनेर चालकाने दुसऱ्या चालकाला ट्रक खाली चिरडलं. यात त्याचा मृ्त्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास वाघोलीतील कटके वाडी परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी राम पुरी याला तत्काळ अटक केलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, परमेश्वर देवराये ( वय ३६, रा. नांदेड ) असे मृत्यूमुखी पडलेल्या चालकाचे नाव आहे. तर परमेश्वर देवराये यांना ट्रकखाली चिरडणाऱ्या चालकाचे नाव राम दत्ता पुरी (वय २५ वर्ष) आहे. कंटनेर चालकाचा खून झाल्याची घटना घडल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह लोणी कंद पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी राम पुरीला तत्काळ अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैजनाथ केदार करत आहेत.
दोन्ही चालक गुरुवारी रात्री वाघोलीतील कटके वाडी परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले. त्यानंतर हॉटेलचं बिल देण्यावरून त्यांच्या वाद झाला. दोन्ही चालकाचा राग अनावर झाला होतात त्यांच्या बाचाबाचीचं रुपांतर थेट हाणामारीत झालं. वाद होत होता तेव्हा परमेश्वर नावाच्या चालकाने राम दत्ता पुरी याला चापट मारली.
पुरीने त्याचा राग आपल्या मनात घेतला. चापट मारल्याची तिडक त्यांच्या डोक्यात गेली. मग मागचा पुढचा विचार न करता राम दत्ता पुरी याने आपल्या ट्रकमध्ये बसून त्याला अॅक्सलेटर देत भरघाव वेगाने कंटेनर थेट परमेश्वर यांच्या अंगावर घातला. यात परमेश्वर यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी चालकाला अटक केली. दरम्यान या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी रामचंद्र शिवराम पोले ( वय ४४ वर्ष, सध्या रा.चाकण ता. खेड ) यांनी फिर्याद दिलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.