नोकरीचं स्वप्न दाखवलं, लॉजमध्ये डांबलं! शिरूरमध्ये २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

Pune Crime News: चांगल्या पगाराच्या नोकरीचं आमिष दाखवून २२ वर्षीय तरुणीला शिरूरमधील लॉजमध्ये डांबून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune Crime News:
22-Year-Old Woman Allegedly Assaulted After Being Lured With Job Promise in Pune’saam tv
Published On

रोहिदास गडगे, साम प्रतिनिधी

पुण्यातील शिरूर शहरातून २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. चांगल्या पगाराच्या नोकरीचं आमिष दाखवून तरुणीला लॉजमध्ये डांबण्यात आलं आणि नशा देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात येत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, पीडिता २२ वर्षीय तरुणी मूळ छत्तीसगडमधील आहे. ती सध्या पुण्यातील चाकण परिसरात वास्तव्यास आहेत.

या पीडितेला चांगल्या पगाराचं काम मिळवून देण्याचं आमिष दाखवून आरोपीने तिला कारमधून शिरूरला नेले. १९ ते २१ ऑगस्टदरम्यान शिरूर हद्दीतील एका लॉजमध्ये तरुणीला डांबून ठेवलं. त्यावेळी तिला जबरदस्तीने नशा देणारी पांढरी पावडर खायला देऊन तिच्या इच्छेविरुद्ध सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय.

Pune Crime News:
Udgir Crime: तब्बल 2,134 कोटींचा घोटाळा,16 कंपन्यांशी संगनमत करून परदेशात पाठवला पैसा; आयकर विभागाच्या तपासात मोठा खुलासा

यासोबतच मारहाण, शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचाही आरोप आहे. या घटनेनंतर पीडित तरुणीने शिरूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली असून, सात जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime News:
Mumbai Crime: मुंबई हादरली! एअर होस्टेसवर बलात्कार, तृतीयपंथी असल्याचे सांगत घरात घुसला अन्...

नागपूर हादरले! चौथीच्या विद्यार्थिनीचा ट्युशनमध्ये विनयभंग

नागपुरात चौथीत शिकणाऱ्या 10 वर्षीय विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. विद्यार्थिनी शिकवणी वर्गात एकटी असताना आरोपीने तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सुमारे चार ते साडेचारच्या दरम्यान संबंधित विद्यार्थिनी शिकवणी वर्गासाठी गेली होती. त्यावेळी शिक्षिका वर्गात उपस्थित नव्हत्या. त्यामुळे विद्यार्थिनी वर्गात एकटीच अभ्यास करत होती. याचवेळी आरोपीने वर्गात येऊन तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी हा संबंधित शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेचे वडील असल्याचं सांगण्यात येत आहे. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तपास सुरू केला. या प्रकरणी पोक्सो कायद्याच्या कलम ८ आणि १२ तसेच बीएनएसच्या कलम ७५(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com