Pune Crime: टीप मिळाली अन् सापळा रचला... हिंजवडी पोलिसांकडून तब्बल १८ लाखांचा गुटखा जप्त; दोघांना अटक

Pune Latest News: पुणे बेंगलोर महामार्गावर सागर हॉटेल समोर सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली.
Pune Crime: टीप मिळाली अन् सापळा रचला...  हिंजवडी पोलिसांकडून तब्बल १८ लाखांचा गुटखा जप्त; दोघांना अटक
Pune Crime: टीप मिळाली अन् सापळा रचला... हिंजवडी पोलिसांकडून तब्बल १८ लाखांचा गुटखा जप्त; दोघांना अटक Saamtv
Published On

Pimpari Chinchwad Crime:

राज्यात ड्रग्ज तस्करीचे प्रकार वारंवार समोर येत असतानाच पिंपरी चिंचवडमधून मोठी बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी पोलिसांनी प्रतिबंधित असलेला तब्बल 18 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. मुंबई पुनावळे येथे पुणे बेंगलोर महामार्गावर सागर हॉटेल समोर सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली. (Crime News In Marathi)

याबाबत अधिक माहिती अशी की, हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा पिकप गाडीमध्ये काहीजण प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी येणार आहे.. अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे हिंजवडी पोलिसांनी पुणे- बंगळुरू महामार्गावर (Pune Banlore Highway) कारवाईसाठी सापळा रचला होता.

यामध्ये पोलिसांनी तब्बल १८ लाखांचा गुटखा जप्त केला आहे. तसेच वाकाराम ठकारांमजी जाट आणि बोगाराम सुखराम बिश्नोई ह्या दोन आरोपींनाही अटक केली आहे. या दोन्ही आरोपींना गुटखा विक्रीसाठी उपलब्ध करून देणारा सुजीत खिवसारा हा आरोपी अजूनही फरार आहे.

  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune Crime: टीप मिळाली अन् सापळा रचला...  हिंजवडी पोलिसांकडून तब्बल १८ लाखांचा गुटखा जप्त; दोघांना अटक
Maratha Reservation: 'मराठा आरक्षण मिळावे हीच इच्छा...' चिठ्ठी लिहून चाकणमधील २२ वर्षीय तरुणाने संपवले आयुष्य

दरम्यान, या कारवाईथ अटक करण्यात आलेल्या आणि फरार आरोपी विरोधात हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये भादवि कलम 328, 272, 273, 188 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

नाशिक पोलिसांची पुन्हा सोलापूरमध्ये धाड...

ड्रग्ज प्रकरणात  नाशिक पोलिसांनी पुन्हा सोलापूरमध्ये मोठी कारवाई केल्याचे समोर आले आहे. सामनगाव ड्रॅग्ज प्रकरणाचे पाळेमुळे शोधत असताना पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील मोहोळ येथील नाशिकच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने हा कारखाना उध्वस्त केला. तर या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली असून नऊ किलो ६९० ग्रॅम एमडी आणि किलो 500 ग्रॅम एमडी सदृश्य अमली पदार्थ जप्त केले आहेत. (Latest Marathi News)

Pune Crime: टीप मिळाली अन् सापळा रचला...  हिंजवडी पोलिसांकडून तब्बल १८ लाखांचा गुटखा जप्त; दोघांना अटक
Gunaratna Sadavarte: विद्वान असतील त्यांना घ्यावं, पण विशिष्ट समाज...'; मराठा आरक्षण समितीवर गुणरत्न सदावर्तेंचा आक्षेप

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com