Nashik Shocking : महाराष्ट्र हादरला! आधी पोटच्या लेकीला संपवलं, नंतर स्वत: आयुष्याची दोर कापली, पोलीस कर्मचाऱ्याचं धक्कादायक पाऊल

Nashik Police Swapnil Gaikwad Suicide : नाशिकमध्ये भयंकर घटना घडली आहे. या घटनेनं अख्खं नाशिक सुन्न झालं आहे. एका पोलीस कर्मचाऱ्यानं आपल्या ६ वर्षीय लेकीची हत्या करत स्वत: गळफास घेत आत्महत्या केलीय.
Nashik police officer Swapnil Gaikwad killed his six year old daughter and ended his own life
Nashik police officer Swapnil Gaikwad killed his six year old daughter and ended his own lifeSaam Tv News
Published On

तरबेज शेख, साम टिव्ही

नाशिक : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. हत्या, बलात्कार, दरोडा आणि आत्महत्या अशा अनेक प्रकारच्या घटना दररोज घडत आहेत. त्याचदरम्यान, नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिकमधील जेल जेलरोड परिसरात एका ६ वर्षीय चिमुकलीची हत्या करुन पोलीस कर्मचााऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. स्वप्नील गायकवाड (वय ३४) यांनी आपल्या ६ वर्षीय मुलीला गळफास देत स्वत: आत्महत्या केली आहे. स्वप्नील गायकवाड हे उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

१२०० फूट खोल दरीत मृतदेह आढळले

पुण्यातील जुन्नरजवळच्या १२०० फूट खोल दरती दोन मृतदेह आढलल्यानंतर एकच खळबळ उडाली. दुर्गम आदिवासी भागात असलेल्या कोकणकडा परिसरात तरूणी आणि एका व्यक्तीचा मृतदेह आढळला असून, या घटनेची संपूर्ण चर्चा होतेय. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतांमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याचा आणि एका तरुणीचा समावेश आहे, ज्यामुळे या प्रकरणाने गंभीर स्वरूप प्राप्त केले आहे.

Nashik police officer Swapnil Gaikwad killed his six year old daughter and ended his own life
Malegaon Karkhana Election : माळेगाव कारखाना निवडणुकीत तावरेंचं खातं उघडलं, महिला गटातून अजित पवारांना झटका

मृत व्यक्तींची ओळख श्रीगोंद्यात तलाठी म्हणून कार्यरत असलेले ४० वर्षीय रमेश सूर्यवंशी आणि आंबोली (ता. जुन्नर) येथील २२ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनी रूपाली अशी आहे. जुन्नर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप गायकवाड यांनी या घटनेची माहिती प्रसारमाध्यमांनी दिली. पोलिस आणि स्थानिक बचाव पथकाने अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत दरीत उतरून मृतदेह बाहेर काढले.

Nashik police officer Swapnil Gaikwad killed his six year old daughter and ended his own life
Maharashtra Politics : उद्धव ठाकरे-राज ठाकरेंच्या युतीवर मनसेमध्येच मतभेद?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com