Abu Salem News: कुख्यात गँगस्टर अबू सालेमला तळोजा कारागृहात धोका; नाशिकच्या जेलमध्ये आणण्यासाठी हालचाली सुरू

Abu Salem Mumbai Blast Case: अबू सालेम कुख्यात दहशतवादी आहे. त्याच्यावर विविध खटले सुरू आहेत. सध्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात त्याला शिक्षा झाली आहे. सालेम सध्या मुंबईच्या तळोजा कारागृहात आहे. मात्र या कारागृहामध्ये अबू सालेमच्या जिवाला धोका असल्याचे बोलले जात आहे.
Abu Salem News: कुख्यात गँगस्टर अबू सालेमला तळोजा कारागृहात धोका; नाशिकच्या जेलमध्ये आणण्यासाठी हालचाली सुरू
Abu Salem Mumbai Blast Case: Saamtv

मुंबई/नाशिक, ता. २८ जून २०२४

कुख्यात गँगस्टर आणि मुंबई बॉम्बस्फोट खटल्याशी संबंधित आरोपी अबू सालेम सध्या मुंबईच्या तळोजा कारागृहात आहे. मात्र या कारागृहामध्ये अबू सालेमच्या जिवाला धोका असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्याला नाशिकच्या कारागृहात हलवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

Abu Salem News: कुख्यात गँगस्टर अबू सालेमला तळोजा कारागृहात धोका; नाशिकच्या जेलमध्ये आणण्यासाठी हालचाली सुरू
VIDEO : गाजर हलवा, सरकार पळवा; विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणा, एकाचवेळी सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कुख्यात गँगस्टर आणि मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अबू सालेम सध्या मुंबईच्या तळोजा कारागृहात आहे. या कारागृहात त्याला धोका असल्याचे बोलले जात आहे. तळोजा कारागृहाच्या अंडा सेलमध्ये अबू सालेम याला ठेवण्यात आले आहे. मात्र या अंडा सेलच्या भिंती कमकुवत झाल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आला आहे.

त्यामुळे या अंडा सेलची दुरुस्ती प्रस्तावित आहे. अबू सालेमला सध्या नवी मुंबईच्या तुळजा कारागृहात सुरक्षेच्या दृष्टीने धोका आहे. त्यामुळे त्याला नाशिकच्या कारागृहात हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या आठवड्याभरात याबाबतचा निर्णय होईल. हा निर्णय झाल्यास नाशिकच्या कारागृहाची सुरक्षितता वाढवावी लागणार आहे.

Abu Salem News: कुख्यात गँगस्टर अबू सालेमला तळोजा कारागृहात धोका; नाशिकच्या जेलमध्ये आणण्यासाठी हालचाली सुरू
Chandrapur Crime News : आनंदवनात युवतीची हत्या, सेवाग्रामहून परतल्यानंतर पालकांना बसला माेठा धक्का

दरम्यान, अबू सालेम कुख्यात दहशतवादी आहे. त्याच्यावर विविध खटले सुरू आहेत. सध्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात त्याला शिक्षा झाली आहे. सालेमला १९ वर्षांपूर्वी पोर्तुगालमध्ये अटक करण्यात आली होती. वादग्रस्त अभिनेत्री मोनिका बेदी हिच्यासह त्याला भारतात आणण्यात आले होते. त्याला प्रारंभी अर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले होते.

ऑर्थर रोड कारागृहात अबू सालेमवर हल्ला झाल्याने तळोजा कारागृहात हलवण्यात आले होते. आता तळोजा कारागृहातील अंडा असेल सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नसल्याच्या कारणामुळे त्याला नाशिक कारागृहात हलवण्याची शक्यता आहे.

Abu Salem News: कुख्यात गँगस्टर अबू सालेमला तळोजा कारागृहात धोका; नाशिकच्या जेलमध्ये आणण्यासाठी हालचाली सुरू
Crop Insurance: नुकसान लाखो रुपयांचे अन् मदत फक्त ३ रुपये; पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा, संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com