VIDEO : गाजर हलवा, सरकार पळवा; विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणा, एकाचवेळी सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

Opposition Protest At Vidhan Bhavan: विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभं राहून गाजर दाखवून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विधानभवन परिसरामध्ये गाजर आणून विरोधकांनी सरकारला गाजर दाखवत आंदोलन केले.
VIDEO : गाजर हलवा, सरकार पळवा; विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणा, एकाचवेळी सत्ताधारी-विरोधक आमनेसामने
Opposition Protest At Vidhan BhavanSaam Tv

राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या (maharashtra assembly monsoon session) दुसऱ्या दिवशी विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभं राहून गाजर दाखवून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विधानभवन परिसरामध्ये गाजर आणून विरोधकांनी सरकारला गाजर दाखवत आंदोलन केले. महाराष्ट्रात गाजर हलवा आणि सरकार चालवा, गाजर हलवा सरकार पळवा, अशाप्रकराच्या घोषणा विरोधकांनी दिल्या. शेतकरी प्रश्न, उद्योग धंदे परराज्यात गेल्यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत.

काही वेळापूर्वी सत्ताधाऱ्यांनी आंदोलन केले होते. पण सत्ताधाऱ्यांचे हे आंदोलन विरोधकांनी हायजॅक केले आहे. विरोधकांनी गाजर दाखवत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गाजर हलवा सरकार पळवा, शेतकरी कर्जमाफी झालीच पाहीजे, या सरकारचे करायचे काय खाली डोकं वर पाय, टेंडरबाज सरकारचा धिक्कार असो, अशाप्रकारच्या घोषणाबाजी विरोधकांनी केली. तसंच, अधोगती महायुती सरकार, शेजारी तुपाशी महाराष्ट्र उपाषी, अब की बार महाराष्ट्रातील उद्योगधंदे सीमापार अशाप्रकारचे बॅनर विरोधकांनी यावेळी झळकावले.

VIDEO : गाजर हलवा, सरकार पळवा; विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणा, एकाचवेळी सत्ताधारी-विरोधक आमनेसामने
Maharashtra Government: राज्यावरील कर्जाचा बोजा वाढला, ७ लाख कोटींपार गेला आकडा; अर्थव्यवस्थेवर आला मोठा ताण

काँग्रेचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना शेतकरी प्रश्नावरून त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. 'सरकार घोषणाबाज आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड हाल आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं रहात नाही. ते म्हणतात आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत पण ते खोटं आहे.'

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जिंतेंद्र आव्हाड यांनी देखील गाजर दाखवत सरकारवर टीका केली. 'घ्या गाजर ...घ्या गाजर, सर्व समाजाला द्या गाजर. एवढ्या वर्षात काही दिले नाही. आता काय देणार. या सरकारला सर्वांना संकटात घालवायचं आहे. गुजरात आमच्या वर गेला पण आम्ही खालती जातोय. लाज नाही वाटत यांना.', अशी टीका आव्हाडांनी केली.

VIDEO : गाजर हलवा, सरकार पळवा; विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणा, एकाचवेळी सत्ताधारी-विरोधक आमनेसामने
Maharashtra Milk Price Issue: शब्द पाळा अन्यथा पायउतार व्हा, डाॅ. अजित नवलेंचे राधाकृष्ण विखे पाटलांना आवाहन; दूधदरासाठी उद्यापासून राज्यभर आंदाेलन

तसंच, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील सरकारला शेतकरी प्रश्नावरून खडेबोल सुनावले आहेत. 'शेतकऱ्याबद्दल सहानुभूति दाखवत नाही. सहा महिने तुमचा निर्णय घेत नाही. २ महिन्यात मदत व्हायला हवी होती. म्हणजे शेतकऱ्याकडे तुमचं दुर्लक्ष होत आहे.' असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

VIDEO : गाजर हलवा, सरकार पळवा; विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणा, एकाचवेळी सत्ताधारी-विरोधक आमनेसामने
Pune Crime: शर्यतीच्या बैल खरेदीवरुन वाद, बारामती तालुक्यात गोळीबाराचा थरार; एक जण गंभीर जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com