VIDEO : नाशिकमध्ये पैशांचा पाऊस; मतदान केंद्राबाहेर उमेदवाराच्या नावाच्या ५३ पाकिटांत ५००च्या नोटा

nashik teacher constituency election : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतदान केंद्राबाहेर उमेदवाराच्या नावाच्या ५३ पाकिटात ५०० च्या नोटा आढळल्या आहेत. नाशिक शिक्षक निवडणुकीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मतदान केंद्राबाहेर उमेदवाराच्या नावाच्या ५३ पाकिटात ५०० च्या नोटा, नाशिक निवडणुकीत धक्कादायक प्रकार
nashik teacher constituency electionSaam tv
Published On

नाशिक : नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षक मतदारसंघाबाहेर मतदानासाठी पैशांचं पाकिट वाटप होत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. या पैशांच्या पाकिटावर उमेदवार किशोर दराडे यांचे नाव असल्याची माहिती हाती आली आहे. तसेच मतदान केंद्राबाहेर पाकिट वाटप करणाऱ्या व्यक्तीलाही ठाकरे गटाने पोलिसांत नेलं आहे. या प्रकारानंतर मतदारसंघाबाहेर एकच गोंधळ पाहायला मिळाला.

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेदरम्यान गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाला. नाशिकमधील बी डी भालेकर शाळेच्या मतदान केंद्राबाहेर हा गोंधळ पाहायला मिळाला. मतदान केंद्राच्या बाहेर एक व्यक्ती पैसे वाटप करत असल्याच्या कारणावरून गोंधळ उडाला. पैसे वाटणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या व्यक्तीला भद्रकाली पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. या प्रकारामुळे मतदान केंद्राबाहेर काही काळ गोंधळाचं वातावरण होतं.

मतदान केंद्राबाहेर उमेदवाराच्या नावाच्या ५३ पाकिटात ५०० च्या नोटा, नाशिक निवडणुकीत धक्कादायक प्रकार
Maharashtra Assembly Session : प्रथा कायम, चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, पावसाळी अधिवेशनात होणार कडकडाट!

या प्रकारानंतर ठाकरे गटाचे पदाधिकारी पोलीस ठाण्यात पोहोचले. वसंत गीते, विलास शिंदे भद्रकाली पोलीस ठाण्यात पोहोचले. पैशांचं वाटप करणाऱ्या व्यक्तीचं नाव विलास नरवडे आहेत. तो किशोर दराडे यांच्या संस्थेत काम करत असल्याची माहिती हाती आली आहे. या पैशांच्या पाकिटावर किशोर दराडे यांचं नाव आहे.

दरम्यान, मतदान केंद्राबाहेर काही पैशांची पाकिटे सापडली. ४ खाकी पाकिटात प्रत्येकी ५००० रुपये सापडले. पांढऱ्या रंगाच्या ४९ पाकिटात १००० रुपये होते. तर एका पाकिटात ५०० रुपये होते. पोलिसांनी एकूण ६९,५०० रुपये पंचनामा करून जप्त केले.

मतदान केंद्राबाहेर उमेदवाराच्या नावाच्या ५३ पाकिटात ५०० च्या नोटा, नाशिक निवडणुकीत धक्कादायक प्रकार
Nashik Accident News : स्कूल बसची युवकास बसली धडक, रक्ताच्या थारोळ्यात नेले रुग्णालयात; नाशिक पाेलिसांनी दिली महत्वपूर्ण माहिती

वसंत गीते काय म्हणाले?

ठाकरे गटाचे नेते वसंत गीते म्हणाले, 'शिक्षक निवडणुकीत सर्रासपणे पैशांचा वापर होतोय. जळगाव, नाशिकला पैसे जप्त केले आहेत. निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार करणार आहे. निवडणूक आयोगाने यावर कारवाई करावी'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com