Mumbai Rain Update: मुंबईत पावसाचे थैमान; पुढील ३-४ तास महत्वाचे, IMDकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन

Mumbai Rain News: मुंबईत मोठ्या विश्रांतीनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. IMDकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Mumbai Rain Update: मुंबईत पावसाचे थैमान; पुढील ३-४ तास महत्वाचे, IMDकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन
Mumbai Rain UpdateSaam TV

मुंबई : महाराष्ट्रातील विविध भागात पावसाची जोरदार सुरुवात झाली आहे. मॉनसून सुरु झाल्यानंतर हवा तसा पाऊस पडला नव्हता. मात्र, आज गुरुवारी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील काही भागासह मुंबईतही ठिक-ठिकाणी पाऊस सुरु आहे. तसेच पुढील ३-४ तास मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान विभागने नागरिकांना दिला आहे.

मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पावसाने ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. मुसळधार पावसामुळे अंधेरी भागात पाणी साचलं आहे. पाणी साचल्याने अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

गेल्या दोन तासांपासून मुंबईत ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. पुढील ३-४ तास मुंबई शहर आणि उपनगरात तसेच ठाणे आणि रायगडच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Mumbai Rain Update: मुंबईत पावसाचे थैमान; पुढील ३-४ तास महत्वाचे, IMDकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन
Badlapur kondeshwar : मित्रांसोबत फिरायला गेला अन् घरी परतलाच नाही; बदलापूरमधील धबधब्यात बुडून तरुणाचा मृत्यू

कोकणात ऑरेंज अलर्ट जारी

दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणाच्या इतर भागातही मुसळधार पावसाचा शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Mumbai Rain Update: मुंबईत पावसाचे थैमान; पुढील ३-४ तास महत्वाचे, IMDकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन
Mumbai Marine Drive News : भरपावसात मरीन ड्राईव्हला जाणे महागात पडलं, समुद्रात महिला पडली; २ पोलीस देवासारखे धावून आले, VIDEO

दोन दिवसांत मॉन्सून राज्य व्यापणार

अरबी समुद्रात मॉन्सून सक्रिय झाला आहे. राज्यात पुढील दोन दिवसांत मॉन्सून पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरीतही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, साताऱ्यातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com