Mumbai Marine Drive News : भरपावसात मरीन ड्राईव्हला जाणे महागात पडलं, समुद्रात महिला पडली; २ पोलीस देवासारखे धावून आले, VIDEO

woman drowned in sea : मुंबईत भरपावसात मरीन ड्राईव्हला जाणे चांगलंच महागात पडलं आहे. समुद्रात पडलेल्या या महिलेला २ पोलीस देवासारखे धावून आले.
भरपावसात मरीन ड्राईव्हला जाणे महागात पडलं, समुद्रात महिला पडली; २ पोलीस देवासारखे धावून आले, VIDEO
mumbai Marine Drive NewsSaam tv
Published On

सचिन गाड, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईतील विविध भागात जोरदार पाऊस बरसत आहे. समुद्र किनाऱ्यासहित मरीन ड्राईव्ह भागातही जोरदार पाऊस बरसत आहे. या भरपावसात मरीन ड्राईव्हला जाणे एका महिलेला महागात पडलं. मरीन ड्राईव्हमधील कट्ट्यावरून पाय घसरून एका महिला समुद्रात पडली. समुद्रात पडलेल्या महिलेल्या वाचवण्यासाठी २ पोलीस धावले. या पोलिसांनी समुद्रात महिलेला वाचवलं.

मुंबई पोलिसांकडून पावसादरम्यान समुद्र किनारी जाऊ नका, असे आवाहन केले जाते. मात्र, तरीही काही लोकांकडून पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या व्यक्ती समुद्रात पडण्याच्या घटना घडतात. अशाच प्रकारे एक महिला मरीन ड्राईव्ह जवळ समुद्रात पडली.

भरपावसात मरीन ड्राईव्हला जाणे महागात पडलं, समुद्रात महिला पडली; २ पोलीस देवासारखे धावून आले, VIDEO
Dhule Police Accident: कर्तव्य बजावून घरी परतताना काळाचा घाला, पोलीस कर्मचाऱ्याचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू

मरीन ड्राईव्हच्या सुंदर महल जंक्शनजवळ ही महिला समुद्रात पडली. ५९ वर्षीय या महिलेचे नाव स्वाती कनानी आहे. या घटनेनंतर दोन पोलीस कॉन्स्टेबलने समुद्रात उतरून या महिलेचे प्राण वाचवले. पोलीस कॉन्स्टेबल किरण अशोक ठाकरे आणि अमोल ज्ञानदेव दहिफळे असे या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. समुद्रात या महिलेला वाचवल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून महिलेला जीटी रुग्णालयात भरती केलं आहे.

नेमकं घटनास्थळी काय घडलं?

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, '५९ वर्षीय स्वाती कनानी ही अविवाहित महिला मरीन ड्राईव्हजवळील समुद्रात पडली. हायटाईडचा इशारा देऊनही ही महिला समुद्राजवळ आली होती. हायटाईडदरम्यान समुद्राजवळ जाणे धोकादायक आहे. हायटाईटदरम्यान मोठ्या लाटा उसळतात. याचदरम्यान, समुद्रात पडलेल्या महिलेला पोलिसांनी वाचवलं'.

'महिलेला वाचवणाऱ्या पोलिसांचा अभिमान वाटतो. मरीन ड्राईव्हवरून पोलीस कर्मचाऱ्यांनी टायर, रोप्स सारख्या रेस्क्यू साहित्याची मदत घेऊन महिलेला वाचवले, असे पोलिसांनी पुढे सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com