Colaba-Nariman Point Sea Link: कुलाबा-नरीमन पॉईंट सागरी सेतूचा मार्ग मोकळा; कसा असेल मार्ग? मुंबईतील कोणत्या भागाला होणार फायदा?; Video

Colaba-Nariman Point Sagari Setu News: नरीमन पॉईंट ते कफ परेड पूलाचा मार्ग रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कुलाबा ते नरीमन पॉईंट सागरी सेतू ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे.
Colaba-Nariman Point Sagari Setu: कुलाबा-नरीमन पॉईंट सागरी सेतूचा मार्ग मोकळा; कसा असेल मार्ग? मुंबईतील कोणत्या भागाला होणार फायदा?; Video
Colaba-Nariman Point Sagari SetuSaam Digital

कुलाब्यातील वाहतूक फोडण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या कुलाबा ते नरीमन पॉईंट सागरी सेतूचा मार्ग मोकळा झाला आहे. आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्षांच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या सागरी सेतूमुळे कोस्टल रोडचा पुरेपूर वापर होणार असून दक्षिणेकडील रहदारी सोयीची होणार आहे. तसंच पर्यटनाला चालना मिळण्यासह मुंबईकरांसाठी मनोरंजनाची नवी संधी उपलब्ध होणार आहे.

यापूर्वी नरीमन पॉईंट ते कफ परेड असा पुलाचा मार्ग होता. यापूर्वी पूलाचा मार्ग रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता कुलाबा ते नरीमन पॉईंट सागरी सेतूला ग्रीन सिग्नल मिळाला असून कोळी बांधवांना त्रास होऊ नये म्हणून नवीन मार्ग तयार करण्यात येणार आहे. समुद्राच्या मधून जाणारा पूल आता किनाऱ्यावरून जाणार आहे. नरीमन पॉईंट येथील एनसीपीए किनाऱ्याला लागून बुधवार पार्ककडे जाणारा रस्ता तयार केला जाणार आहे. या रस्त्याला लागून मत्स्यालय विकसित केले जाईल, अशी माहिती आहे.

दक्षिण मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी सरकारने या मार्गाची योजना आखली होती. नरिमन पॉइंट ते कुलाब्याशी थेट जोडण्यासाठी समुद्रावर पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (MMRD) दक्षिण मुंबईत सुमारे 1.6 किमी लांबीचा पूल उभारण्यात येणार होता. 2021 पर्यंत पुलाच्या बांधकामाशी संबंधित सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट होतं. मात्र नंतरच्या काळात नरीमन पॉईंट ते कफ परेड पुलाचा प्रस्ताव रद्द करण्यात आला होता.

Colaba-Nariman Point Sagari Setu: कुलाबा-नरीमन पॉईंट सागरी सेतूचा मार्ग मोकळा; कसा असेल मार्ग? मुंबईतील कोणत्या भागाला होणार फायदा?; Video
VIDEO: पुण्यानंतर कल्याण बनतेय 'उडता पंजाब', ढाब्यांच्या नावाखाली खुलेआम हुक्का पार्लर सुरू

पुलाच्या बांधकामासाठी संरक्षण आणि पर्यावरण विभागाकडून परवाना निळण्यांचं मोठं आव्हान होतं. नौदल आणि तटरक्षक दलाच्या अनेक महत्त्वाच्या तळांवरून हा पूल जाणार होता. त्यामुळे या विभागांकडून परवाना मिळण्याची शक्यता होती. बीएमसीने 2019 मध्ये हा पूल बांधण्याचा प्रयत्न केला होता, मात्र प्रकल्प रखडला होता. शिवडी-वरळी कनेक्टर, शिवडी-न्हावासेवा ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प, विरार-अलिबाग कॉरिडॉर, वसई-भाईंदर पूल, कोस्टल रोड, वर्सोवा-वांद्रे सी लिंक आणि वांद्रे-वरळी सी लिंकला जोडण्यात येणार होता. कुलाबा ते नरीमन पॉईंट सागरी सेतूला परवानगी मिळाली आहे.

Colaba-Nariman Point Sagari Setu: कुलाबा-नरीमन पॉईंट सागरी सेतूचा मार्ग मोकळा; कसा असेल मार्ग? मुंबईतील कोणत्या भागाला होणार फायदा?; Video
Kalyan News : कल्याणमध्ये ढाब्यांवर हुक्कापार्टी; VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com