Kalyan News : कल्याणमध्ये ढाब्यांवर हुक्कापार्टी; VIDEO व्हायरल

Kalyan Crime: कल्याण डोंबिवलीत अनेक ठिकाणी ढाब्यांच्या नावाखाली असे हुक्का पार्लर सुरू असल्याचं दिसून येत आहे. हुक्का पार्लरमुळे तरुण नशेच्या आहारी जात आहेत.
kalyan Crime: ढाब्यांच्या नावाखाली खुलेआम सुरू आहेत हुक्का पार्लर, व्हिडिओ व्हायरल
Kalyan hooka parlors Crime:

अभिजीत देशमुख, साम प्रतिनिधी

पुण्यातील एका नामांकित हॉटेलमध्ये काही तरुण नशा काही तरुणांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ही घटना ताजी असताना कल्याणमध्ये देखील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. कल्याण पश्चिमेकडील बिर्ला कॉलेजपासून काही अंतरावर असलेल्या एका ढाब्यावर सुरू असलेल्या हुक्का पार्लरमध्ये काही तरुण हुक्का पीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय.

मात्र या घटनेमुळे कल्याणमधील तरुणाई देखील नशेच्या विळख्यात अडकल्याचे दिसून येतेय. पुण्यातील घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी अशा बेकायदेशीर ढाब्यांवर, हॉटेल्सवर ,बार, पबवर धडक कारवाई करण्याच्या आदेश दिलेत. कल्याण डोंबिवलीत मात्र अनेक ठिकाणी ढाब्यांच्या नावाखाली असे हुक्का पार्लर सुरू आहेत, मात्र पोलीस आणि महापालिका प्रशासनाला अद्याप कारवाईसाठी मुहूर्त मिळालेला नसल्याचे दिसून येतेय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com