कर्तव्य बजावून घरी परतताना काळाचा घाला, पोलीस कर्मचाऱ्याचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू
Dhule Police AccidentSaam Tv

Dhule Police Accident: कर्तव्य बजावून घरी परतताना काळाचा घाला, पोलीस कर्मचाऱ्याचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू

Dhule Accident News: धुळ्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. येथे कर्तव्य बजावून ड्युटी संपल्यानंतर घरी परतणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Published on

धुळे जिल्ह्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. येथे कर्तव्य बजावून ड्युटी संपल्यानंतर घरी परतणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या दुचाकीचा अपघात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नागपूर-सुरत महामार्गावरील धुळे शहरालगत असलेल्या आनंद खेडा गाव शिवारात हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, समोरील कंटेनर चालकाने अचानक ब्रेक मारल्याने पाठीमागे दुचाकीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची दुचाकी कंटेनरवर जाऊन धडकली. यामध्ये दुचाकी वरील पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणात जखमी झाले होते.

कर्तव्य बजावून घरी परतताना काळाचा घाला, पोलीस कर्मचाऱ्याचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू
PM Modi Russia Visit: PM मोदी जुलैमध्ये रशियाच्या दौऱ्यावर, पुतिन यांच्यासोबत या मुद्द्यांवर होणार चर्चा

त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. यानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. गुलाब शिंपी, असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून साक्री पोलीस स्टेशन येथे त्यांची नियुक्ती होती.

कर्तव्य बजावून घरी परतताना काळाचा घाला, पोलीस कर्मचाऱ्याचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू
VIDEO : मोठी बातमी! अजित पवार गटाच्या 6 आमदारांनी घेतली जयंत पाटील यांची भेट; पुन्हा करणार घरवापसी?

साक्रीकडून आनंद खेडाकडे आपली ड्युटी संपल्यानंतर ते घरी परतत असताना हा अपघात झाला. या घटनेची माहिती कुटुंबीयांना कळाल्यानंतर त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन वर्षांचा मुलगा व पाच वर्षांची मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे धुळे पोलीस दलासह ग्रामस्थांमधून एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com