Nanded News: कर्जाचे हप्ते थकले, फायनान्स कंपनीकडून वसुलीच्या धमक्या वाढल्या; नांदेडमध्ये तरुणाने संपवले जीवन

Nanded Crime News : नांदेडमधील एका फायनान्स कंपनीकडून वसूलीसाठी सतत त्रास दिला जायचा. याच त्रासाला कंटाळून एका २८ वर्षीय तरूणाने आत्महत्या केली. व्हिडिओ रेकॉर्ड करून फायनान्स कंपनीवर आरोप केले.
Nanded News: तरुणाने आयुष्य संपवलं, आत्महत्येपूर्वी व्हिडीओ तयार करत सांगितलं कारण
Nanded News: तरुणाने आयुष्य संपवलं, आत्महत्येपूर्वी व्हिडीओ तयार करत सांगितलं कारणmeta ai
Published On

वसूलीचा सतत कॉल येत राहिला. त्रास इतका वाढला की तरूणाने राहत्या घरीच आत्महत्या करून आपले जीवन संपवले. नांदेड शहारातील सिडको येथे बुधवारी रात्री ही घटना घडली. पोट भरण्याकरिता कर्ज काढून चार चाकी खरेदी केली पण हफ्ते थकल्यामुळे कंपनीने वसूलीसाठी सतत तगादा लावला. त्रास दिला. याच नैराश्यातून तरूणाने व्हिडिओ बनवत राहत्या घरी आत्महत्या केली.

एका नामांकित फायनान्स कंपनीकडून मयत तरुण प्रबुद्ध मोरे (२८) याने २०२३ मध्ये कर्ज घेऊन चारचाकी वाहन खरेदी केले होते. सुरूवातीच्या काळात गाडीचे व्यवस्थित हफ्ते देखील भरले. पण २०२५ मध्ये मुंबई पुणे मार्गावर त्याच्या गाडीचा भीषण अपघात झाला.यात चारचाकीचे प्रचंड नुकसान झाले. वाहनाच्या दुरूस्तीसाठी त्याने इंशूरन्सची क्लेम करत चारचाकी दुरूस्त केली.दुरुस्तीसाठी जवळपास ९ महिने चारचाकी गॅरेजमध्ये पडून होती. यामुळे त्याच्या पोटापाण्यावर पाय आला होता

Nanded News: तरुणाने आयुष्य संपवलं, आत्महत्येपूर्वी व्हिडीओ तयार करत सांगितलं कारण
OBC Certificate: सुप्रिया सुळेंसह अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र, काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

गाडीचा अपघात, ९ महिने हाताला काही काम नाही.त्यामुळे हफ्ते फेडायचे कसे? या प्रश्नांमुळे प्रबुद्ध मानसिक तणावात होता. त्यातच फायनान्स कंपनीकडून चारचाकीचे हफ्ते वसुलीसाठी सतत फोन येत होते. किमान २ लाख तरी भरावे लागतील नाहीतर वाहनावर जप्ती आणण्यात येईल अशी सततची धमकी देखील मिळत होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी माझं बोलणं करून द्या मी त्यांना समजावतो. थोडे पैसे भरतो. अशी विनंती देखील प्रबु्द्ध वसूली करणाऱ्यांना करत होता. पण येणाऱ्या सततच्या धमक्या आणि कॉलला कंटाळून आत्महत्या करणार असल्याचा एक व्हिडिओ केला आणि त्यानंतर स्वत:चे आयुष्य संपवले. दरम्यान या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Nanded News: तरुणाने आयुष्य संपवलं, आत्महत्येपूर्वी व्हिडीओ तयार करत सांगितलं कारण
Jalgaon: एकाच कुटुंबातील चौघांची सामूहिक आत्महत्या, धावत्या ट्रेनसमोर उडी मारली; जळगाव हादरले
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com