पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधी
Nagpur pub party murder case : ख्रिसमस सेलीब्रेशन आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तरूणाईकडून जंगी पार्टी केली जाते. उपराजाधानीमध्येही तरूणाईकडून ख्रिसमस पार्टी कऱण्यात आली. पबमध्ये तरूणाई बेफाम होऊन एन्जॉय करत होती, पण वादामुळे एका तरूणाचा मृत्यू झाला. पबमध्ये तरूणांमध्ये वाद झाला. पार्टीनंतर ५ जणांनी हाच राग मनात धरला अन् पहाटे चार वाजता त्या तरूणाचा जीव घेतला. या घटनेनंतर नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नागपूर पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास करण्यात आलाय.
नागपूरातील विमानतळ परिसरात वर्धा रोडवर आज पहाटे एका तरुणाची हत्या करण्यात आली. पबमध्ये झालेल्या भांडणातून पहाटे चार वाजता पाच जणांनी हत्या केल्याची माहिती मिळाली आहे. प्रणय नारनवने असे मृत तरूणाचे नाव आहे. चार ते पाच जणांनी प्रणयला रस्त्यात गाठले अन् त्याचा जीव घेतला. नागपूरातील सोनेगाव पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
काय आहे प्रकरण?
ख्रिसमसनिमित्ताने गुरुवारी डाबो क्लबमध्ये तरूणांनी पार्टी आयोजित केली होती. ही पार्टी झाल्यानंतर क्लबमध्ये दोन गटात जोरात वाद झाला. शाब्दिक चकमक आधी झाली, त्यानंतर याला हिंसक वळण लागले. दोन गटात जोरात हाणामारी झाली. आरोपी मेहुल रहाटे याने प्रणय नन्नावरे आणि गौरव कारडा या दोघांवर धारदार हत्यार, लोखंडी सळई तसेच विटेने हल्ला केला. या हल्ल्यात प्रणय याचा मृत्यू झाला तर गौरव जखमी झाला. गौरव कारडा याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून तो सध्या आयसीयूमध्ये उपचार घेत आहे.
क्लबबाहेर झालेल्या राड्याची माहिती मिळताच सोनगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. आरोपीचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या प्रकरणात मुख्य आरोपी मेहुल याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या साथीदाराचा शोध घेतला जातोय. दरम्यान, ख्रिसमसला झालेल्या हत्येच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.