

आरोपींची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आलीय.
आरोपी पीडितेचे नातेवाईक आहेत.
आरोपी आणि पीडिता एकाच गावाचे रहिवाशी आहेत.
नात्याला काळिमा फासणारी घटना नागपूरमधील सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सरोदी टोला (तेलगाव कामठी) येथे घडली. अवघ्या १४ वर्षांच्या मुलीवर तिच्याच दूरच्या नातेवाईक असलेल्या ३ अल्पवयीन मुलांनी अत्याचार केला. या घटनेने संतापाची लाट उसळली आहे. नात्याला काळिमा फासणारी घटना नागपूरमधील सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सरोदी टोला (तेलगाव कामठी) येथे घडली. अवघ्या १४ वर्षांच्या मुलीवर तिच्याच दूरच्या नातेवाईक असलेल्या ३ अल्पवयीन मुलांनी अत्याचार केला.
पीडितेच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत. त्याद्वारे तिला ब्लॅकमेल करत पीडितेवर वारंवार अत्याचार केले. दरम्यान नराधमांकडून होणाऱ्या सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून पीडितेने सावनेर पोलिसांत धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२) (m), ६५(१), ७०(२), ३५१(४) आणि सह पोक्सो (POCSO) कायद्याच्या कलम ६६ (e) व ६७ (b) अंतर्गत गुन्हा दाखल केला.
ग्रामीण नागपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सावनेरचे ठाणेदार उमेष पाटील पुढील तपास करत आहेत.आरोपींची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आलीय. पोलिसांनी तिन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेऊन सावनेर न्यायालयात हजर केले. मात्र आरोपी अल्पवयीन असल्याने न्यायालयाने त्यांना बालसुधारगृहात पाठवण्याचे आदेश दिले.
अहमदाबादमध्ये एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडलीय. अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. एका २२ वर्षाच्या एका तरुणाने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि तिला आपल्या वासनेचा शिकार बनवलं.
याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचा आणि आरोपीची ओळख ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्म फ्री फायरद्वारे झाली होती. या दोघांमध्ये वारंवार बोलणं होत होतं. त्यानंतर २२ जानेवारी रोजी आरोपी पश्चिम बंगालहून अहमदाबादला आला आणि पीडितेला घरी एकटी पाहून तिच्यावर बलात्कार केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.